Diwali 2022 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गेले होते. यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या परिवारास दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यादेखील उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील फडणवीस यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

सध्या राज्यभर मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा होत आहे. दीपावली निमित्त राज्यभर प्रकाशपर्व साजरे होत आहे. यानिमित्त सर्वच क्षेत्रातील लोक ऐकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. राजकीय नेते देखील ऐकमेकांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. याच निमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सहकुटंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गेले होते. यावेळी दोघांनी ऐकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

शेतकरी कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली दिवाळी साजरी

दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी साजरी केली. त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतला. आलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे यावेळी औक्षण देखील करण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी कृती विकास आराखडा तयार करत असल्याचे सांगतानाच नैसर्गिक आपत्तीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. राज्य शासन तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी शेतकऱ्यांना दिली. शेतकरी बांधवांनी पारंपारिक शेतीला आधुनिकतेचे बळ देऊन कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केलं.

आज दिवाळी पाडवा आणि भाऊबीज

आजचा दिवस देखील दिवाळी सणात महत्त्वाचा मानला जातो. कारण आज दिवाळी पाडवा आहे. तसेच भाऊबीजेचा सण देखील आजच आला आहे. दिवाळी पाडव्याला खास महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण दिवाळी पाडव्याची ओळख आहे. या शूभ दिवळी मोठी खरेदी करण्याची पद्धत आहे. याबरोबरच या दिवशी व्यापारी मंडळी आपल्या जमाखर्चाच्या वह्या म्हणजेच चोपड्या, शाईची दौत आणि लेखनसाहित्याची पूजा करतात. काही व्यापारी या दिवसापासून व्यापारी वर्ष चालू करतात. यालाच विक्रमसंवत्सर म्हटले जाते. दरवर्षी लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो. मात्र, यंदाच्या वर्षी भाऊबीज आणि पाडवा एकाच दिवशी आले आहेत. आज दिवाळी पाडवा आहे. कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्याची श्रद्धा आहे.

from maharashtra https://ift.tt/enSD4MH
Diwali 2022 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी
October 25, 2022
0
Tags