Cold Weather in Pune : पावसानं निरोप घेताच राज्यात हुडहुडी वाढली आहे. राज्याच्या अनेक भागात सध्या थंडी वाढल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची (Temperature) नोंद पुण्यात (Pune) झाली आहे. पुण्यात 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. सरासरीच्या तुलनेत हे तापमान 3.2 अंशानं घटलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ( Meteorological Department) राजस्थानमधून येणारे थंड वारे आणि हिमालयीन पर्वत रांगांवर होत असलेली बर्फवृष्टी याचा एकत्रित परिणाम होऊन उत्तर भारतापाठोपाठ महाराष्ट्रातील किमान तापमान कमी झालं आहे.

दिवसा उन्हाचा चटका तर रात्री थंडी

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशाचा निरोप घेतला आहे. महाराष्ट्रातही परतीच्या पाऊस माघारी फिरला आहे. त्यामुळं सध्या राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. याचा परिणाम म्हणून तापमानात घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात गारठा वाढला आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगला आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात थंडीमुळं हुडहुडी वाढली आहे. कोकणत देखील थंडी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या उत्तरेकडून थंड आणि कोरडे वारे वाहत आहे. या हवामानामुळं राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. तर दिवसा असलेल्या स्वच्छ सूर्य प्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढून कमाल तापमानात वाढ झाली आहे. कोकणातील बहुतांश गावांमध्ये सध्या दाट धुके पडत आहे. गाव धुक्यात हरवल्याची स्थिती आहे. ज्यावेळी हवा कोरडी असते त्यावेळी तापमानात चढ किंवा उतार होते. सध्या हवा कोरडी आहे, त्यामुळं थंडी वाढत आहे. दुसरे म्हणजे वाऱ्याची दिशा. वारे कोणत्या बाजूने वाहते यावर देखील तापमानाचं अवलंबून असते. जमिनीवरुन जर वारे येत असेल तर ते वारे कोरडे येते. तर थंडीच्या दिवसात उत्तरेकडे बर्फ पडतो, त्यामुळं तिकडून कोरडे वारे वाहते, यामुळं मध्य भारतात थंडीचा कडाका वाढत

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

पुणे - 12.6
लोहगाव - 14.7
जळगाव - 14
कोल्हापूर - 17.7
महाबळेश्वर - 13.8
नाशिक - 13.3
सांगली - 17.2
सातारा - 14.3
सोलापूर - 16.1
मुंबई - 24
सांताक्रूझ - 20.5
रत्नागिरी - 22.2
पणजी - 22.8
डहाणू - 20.3
उस्मानाबाद - 15.2
औरंगाबाद - 13
परभणी - 15.4
नांदेड - 16.4
अकोला - 17.8
गोंदिया - 17
नागपूर 16.8

उत्तर भारतातही थंडीचा कडाका

उत्तर भारतातही थंडीचा जोर वाढला आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामान कोरडे आहे. त्यामुळं तिथे थंडीचा कडाका वाढला आहे. तापमानातही घट झाली आहे. दिवसा उन्हाचा चटका बसत आहे, तर रात्री थंडीचा जोर वाढत आहे. कमाल आणि किमान तापमानात विशेष बदल होणार नाही. गेल्या एका आठवड्यात हवामानात झपाट्याने बदल झाला आहे. रात्रीच्या वेळी आर्द्रतेचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. रात्री तापमानातही तीन ते चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/oIbSt1E Update : पावसानं निरोप घेताच राज्यात 'थंडी'ची चाहूल, कोरड्या वाऱ्यामुळं वाढली हुडहुडी

from maharashtra https://ift.tt/sMu8vmR
Cold Weather : राज्यात गारठा वाढला, पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद
October 31, 2022
0
Tags