Ads Area

धमक्या देऊ नका, आमचा जन्म शिवसेनेत झालाय, धमक्या द्याल तर..; शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांचा गुलाबराव पाटलांना इशारा

Sanjay Sawant on Gulabrao Patil : धमक्या देऊ नका... आमचा जन्म शिवसेनेत झाला आहे. धमक्या द्याल तर त्याच पद्धतीनं उत्तर देणार, असं शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी नाव न घेता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना आक्रमक इशारा जळगावमधील (Jalgaon News) शिवसेना मेळाव्यावेळी दिला आहे.

शिंदे गटाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना धमक्या दिल्या जात आहेत. तसेच नगराध्यक्षां विरोधात पोलिसांना हाताशी धरून गुन्हे दाखल केलं जात असल्याचा आरोप केला जात आहे, यावरून उद्धव ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख संजय सावंत यांनी शिंदे गटाला जशास तसे उत्तर देत आक्रमक शब्दांत इशारा दिला आहे.

धमक्या देऊ नका... : संजय सावंत

धमक्या देऊ नका, आमचा जन्म हा शिवसेनेतच झाला आहे. त्यांना वाटतंय या विद्या त्यांच्याकडेच आहेत. मात्र या विद्या आमच्याकडे पाचवीला पुजल्या आहेत. त्यामुळे धमक्यांसारखे प्रकार करू नका, जर केले तर त्याला त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल, असा इशारा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी नाव न घेता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना दिला आहे. शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागला तर माझं पालकत्व म्हणून जबाबदारी आहे, त्यामुळे मुंबईला का असेना लवकरात लवकर त्याच्यासाठी धावून येईल, असंही संजय सावंत म्हणाले.

जळगावात आज शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आगामी निवडणुका या महविकास आघाडी म्हणून लढणार आणि शिंदे गटाला मातीत गाडणार : संजय सावंत

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालं आहे. जोपर्यंत अंतिम चिन्ह मिळत नाही. तोपर्यंत घराघरात मशाल चिन्ह पोहचवायचं आहे आणि आगामी काळातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव नगरपालिका आणि नशिराबाद नगर पंचायत या निवडणुका आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, महाविकास आघाडी म्हणून सर्व मित्र पक्षांसोबत लढू, असं म्हणत ज्यांनी शिवसेना फोडायच पाप केलं आहे, अशा सर्वांना मातीत गाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा संजय सावंत यांनी शिंदे गटासह भाजपला दिला आहे. दरम्यान, संजय सावंत यांच्या वक्तव्यावरून उध्दव ठाकरे यांची शिवसेना आगामी काळात निवडणुका या महाविकास आघाडीसोबत लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

from maharashtra https://ift.tt/0i6QotA

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area