BEST Bus Workers Strike: सलग तिसऱ्या दिवशी बेस्टमधील (BEST Bus) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मरोळ आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. वेतन, बोनस, नोकरीसाठीचे नियुक्ती पत्र आदी विविध मुद्यांसाठी आज मरोळ आगारातील (Marol Depot) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवशी मुंबईकरांना (Mumbai) त्रास सहन करावा लागणार आहे.

याआधीदेखील शनिवारी आणि रविवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. मातेश्वरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होते. रविवारी, जोगेश्वरीतील मजास आगार, शीव येथील प्रतीक्षा नगर या डेपोंमध्येही काम बंद आंदोलन करण्यात आले होते. दुपारी कर्मचारी, कंत्राटदार आणि बेस्ट प्रशासनामध्ये झालेल्या चर्चेनंतर काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर, आज हंसा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आंदोलनाला सुरुवात केली आहे मुंबईतील दिंडोशी, मरोळ, शिवाजीनगर, वरळी या डेपोमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या परिणामी बेस्ट बस वाहतूक विस्कळीत झाली आहे.

प्रशासनाने आपला आर्थिक भार कमी करण्यासाठी बस आणि चालकांची कंत्राटदारांकडून नियुक्ती केली आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये मागील काही महिन्यांपासून असंतोष निर्माण झाला आहे. यामध्ये वेळेवर पगार न होणे, नियुक्तीपत्र न देणे आदींसारखे मुद्दे आहेत.

बेस्टमध्ये कंत्राटी बसेस का?

आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट प्रशासनाने खर्च कमी करण्यासाठी आपल्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने बस ताफ्यात घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी निविदा काढण्यात आल्यात. बस आणि चालक यांची नियुक्ती कंत्राटदाराकडून करण्यात येते. तर, निविदेत निश्चित केलेली रक्कम कंत्राटदाराला बेस्टला द्यावी लागते. यामुळे नवीन बस खरेदी आणि नवीन चालकांची नियुक्ती बेस्टला करावी लागत नाही. त्याच्या परिणामी बेस्टची काही प्रमाणात बचत झाली. कंत्राटदाराकडून बेस्टच्या मिनी एसी बस, एसी बस, इलेक्ट्रीक बस चालवण्यात येते. मुंबईत विविध आगारात वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून सेवा पुरवण्यात येते.

from maharashtra https://ift.tt/tkvJaLc
BEST Bus Workers Strike: सलग तिसऱ्या दिवशी 'बेस्ट' विस्कळीत; मरोळ बस आगारामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
October 23, 2022
0
Tags