Jilha Nagari Sahakari Bank Clerk Bharti – संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र व 1000 कोटी + व्यवसाय असलेल्या व संपूर्ण Core Banking Solution वापरत असलेल्या सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली (शेड्युल्ड बँक) आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधारकांकडून क्लार्क पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
Jilha Nagari Sahakari Bank Clerk Bharti
पात्रता
- वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी बी.सी.एस., बी.सी.ए., एम.सी.ए., एम. बी. ए. या शाखेतील प्रथम श्रेणीतील पदवीधर असणे आवश्यक / पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असल्यास किमान 55 % गुण असणे आवश्यक.
- MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक.
- प्राधान्य – JAIIB / CAIIB / GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर.
- रिक्त पदे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असतील.
- वयोमर्यादा : कमाल 25 वर्षे
- बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
- उमेदवार हे सांगली जिल्ह्यातील स्थानिक असणे आवश्यक. {Jilha Nagari Sahakari Bank Clerk Bharti}
अन्य माहिती
- भरती पदसंख्या – 40
- सुरवातीस द्यावयाचा पगार – 10,000/-
अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रिया
- उमेदवाराने प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यानंतर बायोडाटा पाठवावा.
- महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांचेकडील दिनांक 21 /01/2019, दि. 29/11/2021 सहकार आयुक्त यांचेकडील दि. 24/03/2022 व 14/06/ 2022 रोजीचे आदेशान्वये सहकारी बँकांतील नोकरभरती प्राक्रिया शासन नियुक्त संस्थेद्वारेच करणे बंधनकारक आहे.
- त्यानुसार भरती प्रक्रिया सहकार आयुक्तांचे पॅनेलवरील कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; कोल्हापूर यांचेमार्फत राबविली जाणार आहे. [Jilha Nagari Sahakari Bank Clerk Bharti]
- उमेदवारांनी सुरवातीस फक्त अर्ज (बायोडाटा) kopbankassorecruit@gmail.com या ईमेलवर पाठवावेत. सोबत शैक्षणिक व अन्य कागदपात्रांची आवश्यकता नाही. अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे स्कॅन करून पाठवू नयेत. कागदपत्राची पाहणी प्रत्यक्ष मुलाखतीच्यावेळी केली जाईल.
- परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणेत येईल.
- परीक्षा 100 मार्कांची व बहुपर्यायी असणार आहे. पासिंगसाठी किमान 60 मार्क मिळवणे आवश्यक आहे. मात्र मुलाखतीस बोलवताना 60 मार्कावरील गुणवत्ता यादीप्रमाणे प्रथम 60 उमेदवारांनाच बोलविले जाईल. परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम साधारण IIBF च्या धरतीवर आधारित आहे. परीक्षेचा नमुना पेपर सोबत जोडला आहे. परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे ब्रॉशर उमेदवारास त्याच्या ईमेल आयडीवर पाठविले जाईल. सबब ईमेल आयडी पाठविताना अचूक पाठवावा. सदर परीक्षेचे आयोजन कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; कोल्हापूर यांचे मार्फत संगणक सुविधा असणाऱ्या योग्य अशा ठिकाणी केले जाणार आहे. परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळविले जाईल.
- तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल. ऑनलाईन परीक्षेतील मेरीटप्रमाणे ६० उमेदवारांनाच ती मुलाखतीसाठी बोलविले जाईल.
- ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल.
- परीक्षेसाठी रु. 750/- ( जीएसटीसह) या प्रमाणे परीक्षा शुल्क (विना परतीची) आकारले जाणार आहे. उमेदवाराने परीक्षा शुल्क रु. 750/- स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या Timber Market, Kolhapur शाखा IFSC CODE: SBIN0005550, MICR Code : 416002008 वर कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लि; यांचे चालू खाते (Current A/C ) क्र. 40168208057 मध्ये IMPS / NEFT ने अर्जासोबत पाठवावे. रक्कम पाठविताना प्रथम प्राधान्य IMPS ला द्यावे व द्वितीय प्राधान्य NEFT ला द्यावे.
- फी भरल्यानंतर उमेदवाराच्या खात्याला रक्कम डेबिट झालेबद्दल उमेदवाराच्या बँकेकडून आलेला संपूर्ण मेसेज उमेदवाराच्या बायोडाटा मध्ये नमूद असलेल्या ईमेल आयडी वरूनच कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; कोल्हापूर यांना kopbankassorecruit@gmail.com ईमेल आयडीवर पाठवावा. सदर मेसेज ईमेलद्वारे पाठविला तरच परीक्षेबाबतची माहिती असोसिएशन द्वारे उमेदवाराला कळविली जाईल.
- मागणीनुसार परीक्षा शुल्क न भरल्यास उमेदवारास परीक्षेस बोलविले जाणार नाही.
- मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाईल. याबाबतचे सर्व अधिकार मा. संचालक मंडळाकडे राहतील. “Jilha Nagari Sahakari Bank Clerk Bharti”
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/10/2022 रोजी सांयकाळी 6 वाजेपर्यंत राहील.
- या संदर्भात अन्य कोणत्याही खुलाशासाठी बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत असोसिएशन दूरध्वनी क्र. 0231-2627307 /06 किंवा असोसिएशनचा मोबाईल क्रमांक 830033128 वर संपर्क करावा.
- भरती प्रक्रीये संदर्भातील पुढील अपडेट मिळवणेसाठी वेळोवेळी असोसिएशनच्या वेबसाईटला भेट द्या. (Jilha Nagari Sahakari Bank Clerk Bharti)