Train Accident : वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरले आहेत. त्यामुळे नागपूर मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मालखेड-टीमटाला स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी या दुर्घटनेमुळे प्रवाशांची परवड होण्याची शक्यता आहे.

रविवारी रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे रुळावरुन घसरल्याची (Derailment) घटना घडली. ही मालगाडी कोळसा घेऊन जात होती. या दुर्घटनेमुळे नागपूर-मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गानं वळवल्या आहेत, तर काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत.

कोणकोणत्या ट्रेन रद्द झाल्या?

वर्धा : भुसावळ Exp.
नागपूर : सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस
नागपूर : अमरावती इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस
गोंदिया : कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
नागपूर : पुणे एक्सप्रेस
अजनी : अमरावती एक्सप्रेस

कोणकोणत्या महत्वाच्या गाड्या वळविण्यात आल्यात?

पुणे हटीया एक्सप्रेस ही चांदुर बाजार नरखेड मार्गे
अहमदाबाद पुरी एक्सप्रेस
शालिमार एक्सप्रेस
हावडा सीएस एमटी एक्सप्रेस

आज लक्ष्मीपूजनाचा दिवस... तब्बल दोन वर्षांनी देशभरात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात आहे. त्यामुळे उत्साहही तसाच आहे. अशातच ऐन दिवाळीच्या दिवशी मालगाडीचे डबे घसरल्यानं रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. अनेक गाड्या पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या दुर्घटनेमुळे नागपूर मुंबई मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे. तुम्हीही या रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी वेळापत्रक पाहा आणि मगच प्रवासासाठी बाहेर पडा.

from maharashtra https://ift.tt/JdXCbo8
वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरले, रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं
October 23, 2022
0
Tags