Ads Area

Tuljabhavani : मंचकी निद्रा संपवून आई तुळजाभवानी गर्भघरात दाखल, आज घटस्थापना

Tuljapur Aai Tuljabhavani : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या (Kulswamini Tuljabhavani Devi) शारदीय नवरात्र महोत्सव (Navratri Mahotsav) आजपासून सुरु झाला आहे. दोन वर्ष कोरोनाचे (Corona Updates) निर्बंध असल्यानं उत्सवावर देखील निर्बंध होते. आता निर्बंध हटल्यानं उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रीच्या (Navratri 2022) पहिल्या दिवशीच्या आधी मध्यरात्री एक वाजता देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा (Manchaki Nidra) संपवून आपल्या गर्भ घरात दाखल झाल्या. यावेळी आई तुळजाभवानीच्या मूर्तीला पंचामृताचा विधिवत महाभिषेक करण्यात आला.

त्यानंतर पहाटे चार वाजता तुळजाभवानीची मंदिर संस्थांचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.  नऊ दिवसाच्या घोर निद्रेनंतर आई तुळजाभवानीचे दर्शन झाल्याने पडत्या पावसात भाविकांनी विधिवत लोटांगण घालून मोठ्या भक्ती भावाने दर्शन घेतले. महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील भाविक देखील यावेळी मोठ्या प्रमाणात तुळजापुरात दाखल झाले आहोत.  ज्योत घेऊन जाण्यासाठी तरुण भक्तांनीही आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं आल्याचं पाहायला मिळत आहे.

आई तुळजाभवानीच्या मंदिरावर केलेली मनमोहक रोषणाई ही या नवरात्राचे आकर्षण ठरले आहे. नवरात्रीच्या निमित्तानं संपूर्ण तुळजापूर नगरी सजली आहे. ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपली, सिंहासनावर स्थापना
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची गेली 9 दिवसापासून सुरु असलेली मंचकी निद्रा संपली असून पहाटे देवीची मूळ अष्टभुजा मूर्ती सिंहासनावर स्थापित करण्यात आली. त्यानंतर देवींची आरती करण्यात आली. शारदीय नवरात्र उत्सव आज दुपारी घटस्थापनेने सुरु होणार आहे. त्यापूर्वी देवीची मूर्ती विधिवत पूजा करुन पलंगावरून मूळ सिंहासनावर नेण्यात आली. देवीची मंचकी निद्रा ही वर्षातून 3 वेळेस असते. तुळजाभवानी देवी ही देशातील एकमेव चल मूर्ती आहे, दुपारी 12 वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे.

तुळजापुरात आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे भाविकांचे प्रचंड हाल झाले. प्रज्वलित केलेल्या भवानी ज्योत छत्रीचा घेऊन न्याव्या लागत आहेत. मात्र भर पावसात देखील भाविकांचा उत्साह मात्र कायम आहे.  भाविकांच्या प्रचंड संख्येच्या पार्श्वभूमीवर पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी मंदिराबाहेर निवारा नाही. तसेच बंदोबस्त करणारे पोलिस बांधव देखील पावसात भिजत आपल्या कर्तव्यावर असल्याचं पाहायला मिळालं.

इतर महत्वाच्या बातम्या

<a class="topic_text" title="Navratri 2022 : आज शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस, देवी शैलपुत्रीची 'अशी' पूजा करा" href="https://ift.tt/a7kKGEj 2022 : आज शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस, देवी शैलपुत्रीची 'अशी' पूजा करा

<a class="topic_text" title="Navratri 2022 : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला चुकूनही करू नका शुभ कार्य " href="https://ift.tt/lEcJGRF 2022 : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला चुकूनही करू नका शुभ कार्य

from maharashtra https://ift.tt/gIs5nPO

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area