Shivsena Dasara Melava : शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) अखेर ठाकरे गटानं कोर्टात धाव घेतली आहे. महापालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीसाठी होणाऱ्या विलंबामुळे शिवसेनेने (Shiv Sena) हायकोर्टात (High Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे यंदा दसऱ्याला शिवाजी पार्कच्या मैदानावर आवाज कुणाचा असणार? आणि यासंदर्भात हायकोर्ट काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

एकीकडे काल (बुधवारी) गोरेगावमध्ये झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, अशी घोषणा दिली आहे. तसेच, आज एवढी गर्दी तर दसरा मेळाव्याला किती गर्दी असेल, असं म्हणत दसऱ्याला गद्दारांची लक्तरं काढणार, असा इशाराही ठाकरेंनी शिंदे गटाला दिला आहे. तर दुसरीकडे शिंदे गट दसऱ्याला शिवाजी पार्कच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा व्हावी, यासाठी आग्रही आहे. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर कुणाचा मेळावा होणार? की, यंदा दसऱ्याला शिवाजी पार्क मोकळंच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पूर्व परवानगीनंतरही महापालिकेचा निर्णय नाही, शिवसेनेचा आरोप

पूर्व परवानगी मागूनही पालिकेनं अद्याप निर्णय घेतला नसल्याचं सांगत शिवसेनेनं (shivsena) हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेनं गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, महापालिकेच्या जी-उत्तर प्रभागानं अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. या प्रकरणी तातडीनं सुनावणी करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीनं करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या अर्जावर आय मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवापूर्वीच शिवसेने महापालिकेकडे मैदानासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळावं यासाठी अर्ज दाखल केला. दोन्ही गटांच्या अर्जावर महापालिकेनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेने (shivsena News) दाखल केलेल्या याचिकेत मुंबई महापालिका (BMC) आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे.

दसऱ्याच्या दिवशी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे, शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह भरणारा. या दिवशी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर उपस्थिती लावतात. पण यंदा याच दसरा मेळाव्यावरुन राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळं पक्षात उभी फूट पडली. पक्षातील बंडखोर आमदरांनी एकापाठोपाठ एक अशा गोष्टींवर दावा करण्यास सुरुवात केली. पक्षाचं गटनेते पद, पक्ष, पक्षचिन्ह आणि आता थेट दसरा मेळावा ठाकरेंकडून हायजॅक करण्याच्या प्रयत्नात ठाकरे गट असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालय कोणाच्या बाजूनं निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

from maharashtra https://ift.tt/5Uw6l8h
Shivsena Dasara Melava : यंदा दसऱ्याला शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? हायकोर्टात आज सुनावणी, शिंदे-ठाकरे आमने-सामने
September 21, 2022
0
Tags