Sanjay Raut : गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात (Patra chawl land scam) अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर ईडीने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश विशेष न्यायालयाने दिले होते. मागील एक महिन्याहून अधिक काळ राऊत न्यायालयीन कोठडीत असून, ते आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. संजय राऊतांच्या याचिकेवर ईडी आपलं उत्तर सादर करणार आहे

राऊत सध्या 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत
राऊत यांच्या वतीने ॲड. विक्रांत साबणे यांनी पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याची मागणी केली होती; मात्र पुढील आठवड्यातील व्यस्त कार्यामुळे जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होणार नाही, असे विशेष न्या. एम. जी. देशपांडे यांनी स्पष्ट केले होते. त्यावर ईडीच्या वतीने ॲड. कविता पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अवधी मागितला. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी आज निश्चित केली आहे. राऊत सध्या 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.

from maharashtra https://ift.tt/zw5PiEc
Sanjay Raut : संजय राऊतांच्या जामीन याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी, ED सादर करणार उत्तर
September 13, 2022
0
Tags