Nagpur Accident : नागपूरच्या सक्करदरा परिसरात भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील चौघे जण सुमारे 70 ते 80 फूट उंचीवरून खाली फेकले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचा समावेश आहे.

चौघे जण फ्लायओवरच्या खाली फेकले गेले.
नागपूरमध्ये रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास सक्करदरा फ्लायओवरवर अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जबर धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील चौघे जण फ्लायओवरच्या खाली फेकले गेले. दुचाकीवरील चौघे सुमारे 70 ते 80 फूट उंचीवरून खालच्या रस्त्यावर फेकले गेल्याने चौघेजण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्या चौघांचाही मृत्यू
पोलिसांनी धडक देणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाला ताब्यात घेतले असून तो कार मालकाचा ड्रायव्हर असल्याची माहिती आहे. फ्लायओव्हर वरून खाली फेकले गेलेल्या आणि गंभीर जखमी असलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत पावलेल्यांमध्ये एक पुरुष, एक स्त्री आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर अनियंत्रित चारचाकी वाहनाने धडक दिलेल्या दुसऱ्या दुचाकी वर बसलेले चौघेजण गंभीर जखमी आहे.

अपघातांची मालिका सुरूच

नागपूर उमरेड मार्गावर अड्याली फाट्याजवळ देखील मागील महिन्यात अशाच प्रकारे तवेरा कारचा भीषण अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपूर - उमरेड मार्गावर विहीरगाव जवळ भरधाव तवेरा कारने ट्रक ला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की अपघातामध्ये तवेरा कार चक्काचूर झाली. तर या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिलेसह पाच पुरुषांचा समावेश होता, तर एक जण जखमी होता. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात तवेरा ट्रक वर जाऊन आदळली आणि समोरचा भाग चक्काचूर झाला. तर दुसरीकडे काटोल तालुक्यात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली. बोलेरो पिकअपचा अपघात झाला असून, यामध्ये चार महिला मजुरांचा मृत्यू झाला होता. तर या घटनेत इतर पाच महिला मजूर गंभीर जखमी झाल्या होत्या. काटोल तालुक्यातील ईसापुर-घुबडमेट रस्त्यावर हा अपघात झाला होता.

इतर महत्वाच्या बातम्या

आगामी सण-उत्सव देखील निर्बंधमुक्त आणि जल्लोषात साजरे व्हावेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Dhule : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, धुळ्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू

from maharashtra https://ift.tt/baoNAVS
Nagpur Accident : नागपूरमध्ये भीषण अपघात; दुचाकीवरून चौघे 70 ते 80 फूट उंचीवरून खाली, मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचा समावेश
September 09, 2022
0
Tags