Maharashtra Mumbai Rain Updates : मागील काही तासांमध्ये मुंबई (Mumbai) , कोकण (Konkan) तसेच, राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) येणारे 4 ते 5 दिवस राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मुंबईत गेल्या एक तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल (सोमवारी) दिवसभर मुंबईत पावसाच्या रिमझीम सरी कोसळत होत्या. तसेच, मध्यरात्रीही पावसाची उघडझीप सुरु होती. अशातच गेल्या तासाभरापासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून संपूर्ण मुंबई शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त आहे. पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं अंधेरी सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. काही गाड्या सबवेमध्ये अडकल्या असून काही गाड्या साचलेल्या पाण्यामुळे बंद पडल्या आहेत.

पावसाचा जोर असाच जर काहीवेळा कायम राहिला तर पश्चिम उपनगरांत सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. कुर्ल्यात मागील एका तासात 39 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर चेंबूरमध्ये देखील धुवांधार पाऊस कोसळत आहे. चेंबुरमध्ये मागील एका तासात 32 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पुढील काही दिवस विदर्भ, कोकणात मुसळधार पाऊस

दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टी भागांत कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाड्याती काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागाकडून पुढचे काही दिवस सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मच्छिमारांना पुढील 2 दिवस अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षता घेता राज्यातील मच्छिमारांना पुढचे काही दिवस मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पुढील 4 ते 5 दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन भारतीय हवामान विभागानं केलं आहे.

from maharashtra https://ift.tt/uZmabxU
Mumbai Rain Updates : मुंबईत पहाटेपासून पावसाची कोसळधार; सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात
September 12, 2022
0
Tags