Ads Area

MNS : 'अनुरागजी, आमची KDMC फक्त सेटिंग मध्ये स्मार्ट आहे, आपण घरचा आहेर दिला', मनसे आमदाराचा केंद्रीय मंत्र्यांना चिमटा, केले खोचक ट्विट

MNS MLA Raju Patil Tweet : "अनुरागजी, आमची केडीएमसी (KDMC) फक्त सेटिंग मध्ये स्मार्ट आहे, मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्काराची असो.. बरं झालं आपण घरचा आहेर दिला" असा चिमटा मनसे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी ट्विट करत काढला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) कालपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व्यापाऱ्यांची भेट घेत समस्या जाणून घेतल्यात.

“हे शहर स्मार्ट सिटीमध्ये आहे का ? हे ऐकून मी आश्चर्यचकीतच झालो,रस्ते पण खराब आहेत”… केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांचे आयुक्तांना खडे बोल..@ianuragthakur जी,आमची #KDMC फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो….बरं झाले आपणच घरचा आहेर दिला.
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 12, 2022

मनसे आमदार राजू पाटील यांचं खोचक ट्विट

काल अनुराग ठाकूर यांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्तांसह पालिका अधिकाऱ्यांचे भेट घेत विकास कामांचा आढावा घेतला यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी येथील कंट्रोल रूमला भेट दिली यादरम्यान त्यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त करत ही स्मार्ट सिटी आहे हे ऐकून हैराण झालो असे खडे बोल पालिका आयुक्तांना सुनावले. यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी खोचक ट्विट केलं आहे. त्यांनी अनुराग ठाकूर यांच्या या प्रतिक्रिया नंतर अनुराग ठाकूरजी आमची केडीएमसी फक्त सेटिंग मध्ये स्मार्ट आहे ,मग ती टक्केवारीचे असो की नवनवीन पुरस्कार असो ,बर झाल आपण घरचा आहेर दिला असं खोचक ट्विट केलं आहे.

कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज - केंद्रीय क्रीडा ठाकूर

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात कल्याण डोंबिवली महापालिका उल्हासनगर महापालिका अंबरनाथ नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, काही प्रकल्प अनेक वर्षापासून सुरु आहेत. दु:ख या बाबतीचे आहे. याबाबत जी पीडा अधिकारी कर्मचारी वर्गाला झाली पाहिजे, ती त्यांना नाही. ज्या प्रकारे लोकप्रतिनिधीना या बैठकीत आपले मत मांडले आहे. त्यानुसार व्यवस्थेत आणि कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे असे मत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. तसेच दोन महिन्यानंतर पुन्हा येऊन या सगळ्यांचा आढावा मी घेणार, त्यात किती प्रगती झाली हे पाहणार असे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले..

भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कालपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करत आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी घेतल्या डोंबिवलीचा दौरा आटोपल्यानंतर आज त्यांनी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात देखील दौरा केला यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांसह व्यापाऱ्यांची देखील बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर सायंकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाला भेट देत स्मार्ट सिटी कार्यालयाचे सुरू असलेल्या यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांची कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण डोंबिवली महानगपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात बैठक घेतली.

तब्बल चार तास जंबो बैठक सुरू
या बैठकीला कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे  यांच्यासह उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ पालिकेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक देखील उपस्थित होते. या बैठकीत दोन महापालिका आणि एका पालिकेच्या हद्दीत सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. तब्बल चार तास ही जंबो बैठक सुरू होती. या बैठकीत महापालिका हद्दीतील वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी चांगली झाडाझडती घेतल्याचे बोलले जातयं.

CCTV मुळे कल्याण डोंबिवलीतील क्राईम डिटेक्शन 80 टक्के - डीसीपी सचिन गुंजाळ

शहरात लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेराबाबत पोलीस यंत्रणेकडून आढावा घेत या कॅमेरामुळे किती गुन्हेगारी कमी झाली? याचा देखील आढावा घेतला. यावेळी स्मार्ट सिटी अंतर्गत लागलेल्या सीसीटीव्हीमुळे गेल्या आठ महिन्यात कल्याण परिमंडळ 3 चा क्राईम डिटेक्शन 80 टक्के आहे. असा खुलासा कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केला आहे. गेल्या काही महिन्यात सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात क्राईम डिटेक्शनमध्ये कल्याण डोंबिवली एक नंबरला आहे.  डिटेक्शन रेट 65 टक्के होता. तो सिसीटीव्हीमुळे  80 टक्क्यावर पोहचला आहे. इतकेच नाही तर कोर्टात सुद्धा याची मदत होत असल्याचे सांगितलं .

from maharashtra https://ift.tt/ucbljvS

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area