Maharashtra Rain : हळूहळू राज्यातील पावसाचा (Rain) जोर कमी होताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली आहे. मात्र, मुंबईसह (Mumbai) परिसरात रात्री हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. पहाटेपासून पुन्हा मुंबईत ठिक ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) काल विदर्भासह राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील काही ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. आजही विदर्भातील काही जिल्ह्यात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसरा परतीच्या पावसासाठी राज्यात अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. वायव्य राजस्थान आणि गुरजारच्या कच्छमधून परतीचा पाऊस सुरु झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे.

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.

अतिवृष्टीमुळं काही ठिकाणी शेती पिकांना फटका

सुरुवातील जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली होती. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकं वाया गेली आहेत. तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक भागात पशुधनाचं देखील नुकसान झालं आहे. दरम्यान, राज्य सरकारनं दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टीनं राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

from maharashtra https://ift.tt/x9hUcBe
Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर कमी, आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा 'यलो' अलर्ट
September 23, 2022
0
Tags