ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...

अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर
आम आदमी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे 'होमपिच' असलेल्या गुजरातवर लक्ष केंद्रीत केले आहे. आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस आहे.

आजपासून सुरू होणार दुसरा जम्मू चित्रपट महोत्सव
दुसरा जम्मू चित्रपट महोत्सव 3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 15 देशांतील 54 चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

गृहमंत्री अमित शाह केरळ दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री शनिवारी केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. ते दक्षिण प्रादेशिक परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. पाणीवाटप, किनारपट्टी सुरक्षा आणि इतर महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगाना राज्य सहभागी होणार आहेत.

नासा मून रॉकेट लाँच करणार
नासा (NASA) शनिवारी ताकदवर मून रॉकेट (Moon Rocket) लाँच करणार आहे. शनिवारी दुपारी फ्लोरिडा येथील कॅनिडी स्पेस सेंटरमधून (Kennedy Space Center) दोन वाजून 17 मिनिटांनी मून रॉकेट अवकाशात भरारी घेईल. दरम्यान, याआधी तांत्रिक कारणामुळे लाँचिंग रोखण्यात आलं होतं.

आशिया चषक सुपर 4 फेरीला सुरुवात
हाँगकाँगचा तब्बल 155 धावांनी पराभव करत पाकिस्तान संघानं आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. शनिवारपासून आशिया चषकातील सुपर 4 फेरीला सुरुवात होत आहे. अफगाणिस्तान, भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान संघानं सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी संध्याकाळी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये लढत होणार आहे.

from maharashtra https://ift.tt/QdsLekS
Maharashtra Breaking News : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
September 02, 2022
0
Tags