ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...

608 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान -
राज्यातील 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या ठिकाणी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे. नंदूरबार- जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे. तसेच यवतमाळ जिह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. 70 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 261 उमेदवार रिंगणात असून सदस्यपदासाठी 1031 उमेदवार रिंगणात आहेत.

राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज सकाळी विदर्भ एक्सप्रेस ने ते मुंबईवरून नागपूरला पोहोचतील. सकाळी आठ वाजता मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचे रेल्वे स्टेशनवर भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर सकाळी 11 पासून नागपूरच्या रवी भवन सर्किट हाऊस वर राज ठाकरे नागपूर शहर आणि ग्रामीण मधील कार्यकर्त्यांशी संघटनात्मक बैठकांच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत.

अनुराग ठाकूर यांची पत्रकार परिषद -
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या लोकसभा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. या दौऱ्यादरम्यान ते धारावीत दलित आणि मागास समाजाच्या घरी जाऊन भोजन करतील. मागास आणि दलित समाजाला भाजप सोबत जोडण्याचा या निमित्ताने प्रयत्न राहणार आहे. दुपारी एक वाजता त्यांची पत्रकार परिषद असेल.

भुपेंद्र यादव बुलढाणा दौऱ्यावर -
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव दोन दिवसांच्या बुलढाणा दौऱ्यावर येत आहेत. खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात त्यांचे संघटनात्मक विविध कार्यक्रम आहेत. 18 सप्टेंबर रोजी खामगाव तर 19 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करणार आहेत.

अरविंद सावंत अकोला दौऱ्यावर -
शिवसेना नेते, माजी केंद्रीयमंत्री, खासदार अरविंद सावंत सावंत एक दिवसाच्या अकोला दौऱ्यावर आहेत. अकोल्याचे संपर्कप्रमुख राहिलेल्या अरविंद सावंतांची शिवसेना नेतेपदावर नियुक्ती झाल्यानंतरचा हा पहिलाच अकोला दौरा आहे. आज दुपारी 1 वाजता ते बाळापूर तालूक्यातील वाडेगाव येथे दिव्यांगांना सायकल वाटप करतील. तर दुपारी 4 वाजता अकोला येथे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतील.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार -
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा होणार आहे. माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात विखे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडणार आहे.

काँग्रेसचा ओबीसी मेळावा -
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. काँग्रेसचा ओबीसी मेळावा होणार आहे. सकाळी 10 वाजता औरंगाबाद रोडवरील धनलक्ष्मी लॉन्सवर पार पडणार आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून यावेळी काँग्रेसचे महत्वपूर्ण नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अहमदनगर दौऱ्यावर येत आहे...येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी बैठका करणार आहेत.

24 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली महिला आपल्या घरी परतणार

भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या हिराबाई निखारे ही महिला 1998 सालापासून घरातून बेपत्ता झाली होती. यानंतर ही महिला अनेक वर्ष पैठण येथे बेवारसपणे फिरत होती त्यानंतर काही वर्ष ही महिला चोपडा तालुक्यातील वेली येथे देखील रहात होती मात्र गेल्या दोन वर्षांपासून ही महिला काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून धुळे शहरातील सावली वृद्धाश्रम येथे वास्तव्यास आली होती, मनोरुग्ण असणाऱ्या या महिलेवर सावली वृद्धाश्रमाचे संचालक आप्पा खताळ यांनी उपचार केले, यानंतर या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली, या महिलेला तिचे कुटुंबीय तसेच गावाचं नाव आठवू लागले, या महिलेने दिलेल्या माहितीनुसार धुळे जिल्हा पोलीस आणि भंडारा जिल्हा पोलिसांच्या मदतीने तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात आला, अखेर हा शोध घेण्यात पोलिसांना आणि सावली वृद्धाश्रमाच्या पदाधिकाऱ्यांना यश आले. या महिलेला दोन मुले असून ही दोन्ही मुले आज आपल्या आईला घेण्यासाठी वृद्धाश्रमात येणार आहेत. आज या महिलेला मुलांच्या स्वाधीन केले जाणार आहे. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलीची माहेरून सासरी पाठवणी करतात, त्या पद्धतीने या महिलेला सन्मानपूर्वक निरोप दिला जाणार आहे.

10 हजार तरुण धावणार -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली भाजपकडून स्लम क्रॉस कंट्री मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता अमित शाह यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दिल्लीमधील झोपडपट्टीतील दहा हजार तरुण यामध्ये धावणार आहेत.

पीयूष गोयल सौदी अरेबियाला देणार भेट
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, 18-19 सप्टेंबर 2022 रोजी आर्थिक आणि गुंतवणूक समितीच्या मंत्रीस्तरीय बैठकीत सहभागी होण्यासाठी सौदी अरेबियाच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री राजपुत्र अब्दुल अझीझ बिन सलमान यांच्यासह पीयूष गोयल आर्थिक आणि गुंतवणूक समितीच्या मंत्रीस्तरीय बैठकीच्या उद्घाटन समारंभाचे सह अध्यक्ष पद भूषवतील.

राजनाथ सिंह इजिप्त दौऱ्यावर -
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज तीन दिवसाच्या इजिप्त दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते दोन्ही देशाच्या संरक्षण संबधावर संबधित मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे.

परराष्ट्र मंत्री 11 दिवसाच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर-
परराष्ट्र मंत्री जयशंकर आजपासून 11 दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते संयुक्त राष्ट्र महासभासह त्रिपक्षीय बैठकीत भाग घेणार आहेत. तसेच बायडन प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

एकदिवसीय मालिका -
भारतीय महिला संघ आजपासून इंग्लंड महिला संघाविरोधात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दिग्गज खेळाडू झूलन गोस्वामी निवृत्त होणार आहे, तिला विजयी भेट देण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरले.

from maharashtra https://ift.tt/B6T50vN
Maharashtra Breaking News Live 18 September 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
September 17, 2022
0
Tags