ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.

लाडक्या बाप्पांचे उद्या विसर्जन

दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पांचे उद्या विसर्जन होणार आहे. उद्या अनंत चतुर्दशी आहे. हिंदू धर्मात गणपतीला आराध्य दैवत मानल्या जाते. दहा दिवस मनोभावे गणपतीची पूजा करतात आणि 11 व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला विसर्जित करतात. राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणी पोलीस आणि प्रशासन सज्ज झालं आहे. मुंबईमध्ये 15,500 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्यातील इतर भागातही कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा छत्तीगड दौऱ्यावर

भाजप अध्यक्षजे जे.पी. नड्डा हे चार दिवस छत्तीगड दौऱ्यावर आहेत. या चार दिवसांच्या दौऱ्यात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुरू करणार टीबी मुक्त अभियान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डिजीटल माध्यमातून ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान’ची सुरूवात करणार आहे.

'सीता रामम' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'सीता रामम' हा सिनेमा आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दाक्षिणात्य सुपस्टार दुलकर सलमान, पुष्पा फेम रश्मिका मंदान्ना आणि बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत. ओटीटीवर हा सिनेमा तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं कथानक सीता आणि रामच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात प्रेक्षकांना 60 ते 70 दशकातील लव्ह स्टोरी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आता या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत.

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात लढत

आशिया चषकामध्ये आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. सायंकाळी सात वाजता नाणेफेक होणार आहे. मागील काही सामन्याचा रिझल्ट पाहाता नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. प्रथम गोलंदाजी करणारा संघानं येथे सामने जिंकले आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे फायनलपूर्वी दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. रविवारी 11 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशियाचा किंग कोण यासाठी सामना रंगणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.

from maharashtra https://ift.tt/tJWvNuX
Maharashtra Breaking News 09 September 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
September 08, 2022
0
Tags