Maharashtra Rain : मागील काही दिवसांमध्ये मुंबई(Mumbai) , कोकणासह (Konkan) राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा पाहायला मिळाला, मात्र भारतीय हवामान विभागानुसार (IMD) येणारे 4 ते 5 दिवस राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात येतोय. कोणत्या भागात असेल यलो अलर्ट (Yellow Alert) आणि ऑरेंज अलर्ट? (Orange Alert) जाणून घ्या

4 ते 5 दिवस विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस

दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाडा भागात आज 12 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज 12 आणि उद्या 13 सप्टेंबर हे तीन दिवस सतर्कता बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाने केलंय.

कोणत्या भागात ऑरेंज आणि यलो अलर्ट?
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसाठी आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं आज मराठावाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मच्छिमारांसाठी आवाहन
पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता राज्यातील मच्छिमारांना पुढचे काही दिवस मासेमारीसाठी अरबी समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. पुढील पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे.

from maharashtra https://ift.tt/RnPOC3e
Maharashtara Rain : आज कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या भागात यलो आणि ऑंरेज अलर्ट?
September 11, 2022
0
Tags