Ads Area

INS Vikrant : 'विक्रांत' च्या सुरक्षेसाठी अंबरनाथचं 'कवच!' अँटी मिसाईल सिस्टीम करणार युद्धनौकेचं संरक्षण

Ambernath News : भारतीय नौदलाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या 'विक्रांत' (INS Vikrant) युद्धनौकेचं रक्षण अंबरनाथचं 'कवच' करणार आहे. कवच ही अँटी मिसाईल सिस्टीम असून ती विक्रांत युद्धनौकेचं मिसाईल हल्ल्यापासून रक्षण करणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत (MTPF) ही अँटी मिसाईल सिस्टीम तयार करण्यात आलीये. त्यामुळं अंबरनाथकरांसाठी ही गौरवाची बाब ठरली आहे.

अँटी मिसाईल सिस्टीम करणार युद्धनौकेचं संरक्षण
देशावर सागरी मार्गानं होणारी आक्रमणं रोखण्यासाठी आणि तितक्याच ताकदीनं परतवून लावण्यासाठी 'विक्रांत' ही युद्धनौका 2 सप्टेंबर 2022 रोजी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. संपूर्ण भारतीय बनावटीची असलेल्या या युद्धनौकेची निर्मिती कोचीन शिपयार्डमध्ये करण्यात आली. ही युद्धनौका देशाचं रक्षण करत असली, तरी या युद्धनौकेचं संरक्षण ही देखील अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे शत्रू सैन्यानं या युद्धनौकेवर एखादं मिसाईल डागली, तर त्यापासून रक्षण करण्यासाठी या युद्धनौकेवर 'कवच' ही अँटी मिसाईल सिस्टीम बसवण्यात आली आहे. ज्यावेळी शत्रूकडून विक्रांतवर एखादं मिसाईल डागण्यात येईल, त्यावेळी रडारच्या माध्यमातून कवचला सूचना जाऊन आपोआप त्यातून एक मिसाईल फायर होईल. ही मिसाईल 'विक्रांत'पासून 3 ते 5 किमी अंतरावर शत्रूच्या मिसाईलसमोर एक युद्धनौका उभी असल्याचा आभास निर्माण करेल. ज्यामुळे शत्रूची मिसाईल तिथेच फुटेल आणि 'विक्रांत'चं संरक्षण होईल.

अंबरनाथच्या एमटीपीएफ कारखान्यात निर्मिती

'विक्रांत'वर 4 ठिकाणी बसवण्यात आलेली ही संपूर्ण सिस्टीम संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत (MTPF) तयार करण्यात आलीये. त्यामुळं देशाचा अभिमान असलेल्या 'विक्रांत'ला अंबरनाथचं सुरक्षा 'कवच' असणं ही अंबरनाथकरांसाठी मोठी गौरवाची बाब ठरली आहे. मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीचे प्रमुख, चीफ जनरल मॅनेजर राजेश अगरवाल यांनीही आपल्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचं म्हटलंय.

अंबरनाथकरांसाठी अभिमानाची बाब

अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत भारतीय सैन्यासाठी लागणारी वाहनं, त्यांचे स्पेअरपार्टस, रणगाड्याचा गिअर बॉक्स, बंदुकांचे सुटे भाग अशा तांत्रिक गोष्टींची निर्मिती केली जाते. 2006 पासून या फॅक्टरीत 'कवच' या अँटी मिसाईल सिस्टीमची निर्मिती सुरू झाली. विशेष म्हणजे ही सिस्टीम संपूर्णपणे MTPF फॅक्टरीच्या अधिकारी आणि कामगारांनी मिळून तयार केली असून परदेशी तंत्रज्ञ किंवा तंत्रज्ञान याचा त्यात वापर करण्यात आलेला नाही. आत्तापर्यंत अशा 13 कवच अँटी मिसाईल सिस्टीम भारतीय नौदलाच्या विविध युद्धनौकांवर बसवण्यात आल्या आहेत. मात्र देशाची शान असलेल्या 'विक्रांत'चं रक्षण करण्यासाठी 'कवच'चा वापर होणं, ही निश्चितच प्रत्येक अंबरनाथकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

from maharashtra https://ift.tt/5yqSTuB

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area