Ads Area

Gram Panchayat Election : अर्ज भरण्यासाठी पालघरमधील उमेदवारांना ठाणे, नाशिककडे घ्यावी लागणार धाव; 50 लाखांची उलाढाल होणार!

<a href="https://ift.tt/L02KpPk Maharashtra Gram Panchayat Elections :  पालघर जिल्ह्यात (Palghar News) 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 342 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी किमान दहा हजार इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज भरण्याचा अंदाज आहे. ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी उमेदवाराला जिल्ह्यातील शहरी भागात तसेच ठाणे, नाशिक शहरांमध्ये धाव घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीत फक्त नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी 50 लाख रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात असणाऱ्या 473 ग्रामपंचायतींपैकी 13 ऑक्टोबर रोजी 342 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये सुमारे साडेतीन हजार सदस्यांची निवड होणार असून सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार आहे. एकंदर पाहता या निवडणुकीसाठी दहा ते बारा हजार उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता आहे.

21 सप्टेंबरपासून नामनिर्देशन पत्र ऑनलाइन पद्धतीने भरण्यास प्रारंभ होणार असून याकरिता थकबाकी नसल्याचे ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, शौचालय प्रमाणपत्र, अपत्याचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, वयाच्या पुरावा तसेच 1 जानेवारी 95 नंतर जन्मलेल्या व्यक्तीकडे सरपंच पदांसाठी उमेदवारी दाखल करताना सातवी इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ही सर्व कागदपत्र उपलब्ध करून त्याचे स्कॅनिंग करून संकेतस्थळावर अर्जासोबत भरणे आवश्यक असून याखेरीज उमेदवाराला निवडणुकीसाठी नवीन बँक खाते उघडून पासबुकची झेरॉक्स, अनामत रक्कम भरल्याची पावती, दायित्व घोषणा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवारांनी ऑनलाइन फॉर्म सोबत भरणे आवश्यक आहे. उमेदवारीने ऑनलाईन भरलेला फॉर्मची प्रत काढून त्यावर स्वाक्षऱ्या करणे बंधनकारक असून फोटो अपलोड करणे आणि इतर सर्व कामांसाठी उमेदवारांना ई सेवा केंद्राची मदत घेणे आवश्यक होत आहे.

...म्हणून शहरी भागात येऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न

सद्यस्थितीत जवळपास प्रत्येक गावामध्ये ई- सेवा केंद्र उभारण्यात आले असले तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा तपशील गुपित राहावा म्हणून तालुक्याच्या ठिकाणी किंवा पॅनेल ठरवेल त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अधिकार उमेदवारांचा कल असतो. शिवाय ग्रामीण भागात विजेचा लपंडाव आणि इंटरनेट स्पीडचा अभाव असल्याने शहरी भागात येऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असतो. सध्य स्थिती बहुतांश सायबर कॅफे बंद असल्याने ई- सेवा केंद्रांवर 27 सप्टेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किमान अर्धा तासाचा अवधी लागत असून त्यासाठी उमेदवारांकडून 500 ते एक हजार रुपयांची आकारणी केली जाते. ई- सेवा केंद्रातील या सेवेकरिता शासनाने दर निश्चिती केली नसल्याचे जिल्हा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. एकंदरीत जिल्ह्यातील उमेदवारी अर्जांची संख्या पाहता जव्हार, मोखाडा भागातील उमेदवारांना नाशिक येथे,  वाडा तालुक्यातील उमेदवारांसाठी ठाणे शहारत तर इतर तालुक्यांमध्ये शहरी भागांमध्ये येऊन अर्ज दाखल करावयाचे असून या संपूर्ण प्रक्रियेत किमान 50 लाख रुपयांची उलाढाल होणार आहे.

स्थानीय पातळीवर उमेदवारी भरण्यास सुविधा उपलब्ध करून द्यावी
उमेदवारी अर्ज भरताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नागा नागरिकांचा मागास प्रवर्ग विभागासाठी 100 रुपये अनामत रक्कम असली तरी अर्ज भरण्यासाठी मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील तहसील कार्यालय आणि मंडळ कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माफक दरात ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पुढे येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

<a class="topic_text" title="Gram Panchayat Election : आज राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांत ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी" href="https://ift.tt/OXkJPay Panchayat Election : आज राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांत ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी

<a class="topic_text" title="Grampanchayat : राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान, थेट सरपंच पदासाठीही निवडणूक होणार" href="https://ift.tt/F6XGJIC : राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान, थेट सरपंच पदासाठीही निवडणूक होणार

from maharashtra https://ift.tt/7S962LE

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area