Ads Area

Crime : मुस्लिम मुलीशी विवाह करणारा हिंदू तरुण अचानक बेपत्ता, तरुणाचा घातपात झाल्याचा संशय; श्रीरामपूरमधील प्रकार

Crime news : लव्ह जिहादच्या (Love Jihad) चर्चेने प्रसिद्धी झोतात आलेल्या श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात आता एक अजून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुस्लिम तरूणीशी महिनाभरापूर्वी विवाह करणारा तरुण बेपत्ता झाला असून त्याचा घातपात केल्याचा संशय कुटुंबियांना आहे. तर या तक्रारीनंतर पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतल असले तरी तरूणाचा अजून काहीही ठावठिकाणा लागला नाही.

दोघांनी महिन्यापूर्वी बांधली लग्नगाठ, अन्...
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे राहणारा दीपक बर्डे या आदिवासी भिल्ल समाजाच्या तरूणाचे मुस्लिम मुलीशी प्रेम जुळलेले होते. या संबधाला मुलीच्या घरच्यांचा मात्र तीव्र विरोध होता.. दोघेही सज्ञान असल्याने घरच्यांच्या अपरोक्ष दोघांनी महिन्यापूर्वी लग्नगाठ बांधली आणी आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाकाही घेतल्या. मात्र मुलीच्या घरच्यांनी दीपकला मारहाण आणी दमदाटी करत मुलीला परत घरी नेले होते. आपली पत्नी पुण्यात तीच्या मामाच्या घरी असल्याचं कळल्यानंतर 30 ऑगस्ट रोजी दीपकने घरच्यांना आपल्या मित्रासोबत नोकरी शोधायला पुण्याला चाललो असल्याच सांगत पुणे गाठले आणि तेव्हापासून तो अद्यापही घरी परतला नाही.

तरुणाच्या कुटुंबियांना घातपात केल्याचा संशय

वडिलांच्या फिर्यादीनंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मजनू बबन शेख, इमरान अब्बास शेख, समीर अहमद शेख, अजित बबन शेख यांना ताब्यात घेतले आहे. मात्र आमचा मुलगा कुठे आहे त्याचा शोध पोलीस कधी घेणार असा सवाल दीपकच्या वडीलांनी उपस्थित केलाय. तर आमचा एकुलता एक मुलगा होता तो कुठं गेलाय त्याचं काय झालंय? या विचाराने त्याची आई कासाविस झालीय. त्या तरुणाचा घातपात केला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय..

हिंदू संघटना तीव्र आंदोलन छेडण्याची शक्यता
आठ दिवस उलटून गेले, मात्र दीपकचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने आता कुटूंबीयांचा संयम सुटत चाललाय. जर लवकर त्याचा तपास लावला नाही आणी दोषीवर कारवाई केली गेली नाही तर हिंदू संघटना तीव्र आंदोलन छेडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लव्हजिहाद या मुद्यावरून बदनाम होणारं श्रीरामपूर यातून बाहेर पडणार कधी हे आगामी काळच ठरवेल

इतर बातम्या

Kalyan Crime News : आधी खून, मग आत्महत्येचा बनाव; पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे फुटलं आईच्या हत्येचं बिंग

<a href="https://ift.tt/ypMeHCU School Principal Kidnapped : मैत्रिणीनेच केले होते मुख्याध्यापकाचे अपहरण, 30 लाखांसाठी तब्बल 16 तास ठेवले ओलीस

from maharashtra https://ift.tt/Qbf8a9s

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area