<a href="https://ift.tt/ydYXOsf Danve On Ashok Chavan Devendra Fadnavis Meet : गणेशोत्सवातील (Ganesh Utsav) गाठीभेटींमुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची (Maharashtra Political Crisis) चर्चा सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भेट झाल्यानं या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर आता भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (RaoSaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दानवे यांनी म्हटलं आहे की, आता आम्हाला कोणता दुसरा राजकीय पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही. भारतीय जनता पार्टी कोणता पक्ष फोडत नाही. पण कोणत्या पक्षात फूट पडून ते आम्हाला मदत करायला येत असतील तर त्यांच्या सोबत एकत्र यायला तयार आहोत. आता अशोक चव्हाण यांची चर्चा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरवात स्वातंत्र्य काळात सर्वांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने केली होती. आता गणपती उत्सवामध्ये सर्वच जण एकमेकांकडे जातात. देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले. त्यांच्यामध्ये असंतोष असेल तरी त्याचा आम्ही आता काही उपयोग करणार नाही. पण आम्हाला जेव्हा गरज पडेल उपयोग होईल. तेव्हा आम्ही असंतुष्टांचा उपयोग करून घेऊ, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
आज आम्हाला कोणाची गरज नाही. कोणी आपल्या पक्षात असंतुष्ट होत आमच्या पक्षात आलं तर स्वागत आहे. आमच्या विचारांशी सहमत व्हावं. ही वैचारिक लढाई आहे, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हायवे दिवे येथील निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी रात्री भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी दानवे बोलत होते.
फडणवीस भेटीबद्दल अशोक चव्हाणांनी काय दिलं स्पष्टीकरण
अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे की, आशिष कुलकर्णींच्या घरी दर्शनासाठी गेले होतो, तेव्हा फडणवीस यांच्याशी उभ्या-उभ्या भेट झाली. आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नाही. परवा काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा आहे, त्यासाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि शिंदे गटामध्ये समन्वयासाठी नियुक्त केलेले भाजपचे पदाधिकारी आशिष कुलकर्णी यांच्या घरी काल अशोक चव्हाण आणि फडणवीस गणपतीच्या दर्शनासाठी गेले तेव्हा त्यांच्यात काही वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. ही भेट गणपतीदर्शनामुळे घडलेला योगायोग होता की कुलकर्णी यांनी समन्वयानं भेट घडवून आणली अशी चर्चा देखील रंगली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
<a href="https://ift.tt/UMyBr56 Chavan : काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांबाबत अशोक चव्हाण म्हणाले...
from maharashtra https://ift.tt/PZygJ9q
अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
September 02, 2022
0
Tags