Murbad News : मुरबाड तालुक्यातील कोळेवाडी गावातील गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना होडीतून प्रवास करण्याची वेळ आली आहे. का अशी वेळ आली इथल्या गावकऱ्यांवर? जाणून घ्या.

....यामुळे गावकऱ्यांना होडीचा वापर करावा लागतोय
बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर पाणलोट क्षेत्राचा भाग देखील वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात धरणाचे पाणी वाढू लागलं की पाणलोट क्षेत्रात पाणी यायला सुरुवात होते. हीच बाब लक्षात घेऊन एमआयडीसी प्रशासनाने काचकोली, तोंडली, मोहघर, मानिवली, जांभुळवाडी या गावांचे पुनर्वसन केले आहे. मात्र कोळीवाडी गावाचं अजूनही पुनर्वसन झालेलं नाही. इथे त्यांना गावठाण भागाची ही जागा पुनर्वसनासाठी देण्यात आलेली आहे, त्या जागेचे अजूनही प्लॉटिंग झालेले नाहीत, आणि त्यामुळे गावकऱ्यांना पाणलोट क्षेत्रात राहावं लागतंय. परिणामी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, वृद्धांना, रुग्णांना अलीकडून पलीकडे येण्यासाठी होडीचा वापर करावा लागतोय.

जीवघेणा प्रवास
सध्या बारवी धरणात 80 टक्के पाणी आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रांमधलं पाणी वाढले आहे. त्यामुळे इथून प्रवास करणं हे जीव घेणे झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने गावकऱ्यांसाठी या ठिकाणी होडीचा बंदोबस्त केला आहे, मात्र एकच होडी असल्याने अर्धा तासाहून अधिक वेळ ताटकळत गावकऱ्यांना इथं ये जा करण्यासाठी उभं राहावं लागत आहे. फनसोली ग्रामपंचायतच्या महिला सरपंचांना देखील होडीचाच वापर करावा लागतोय.

गावकऱ्यांची मागणी
गेल्या चार वर्षापासून पावसाळ्यात अशाच प्रकारे होडीचा वापर या गावकऱ्यांना करावा लागतो. आता पाणी ओसरे पर्यंत गावकऱ्यांना या होडीचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर गावठाणचे प्लॉटिंग करून आम्हाला तिकडे न्यावं अशी मागणी गावकरी करतायेत.

इतर महत्वाच्या बातम्या

Jalgaon : ऑडीटर साहेबांनी चक्क अंतर्वस्त्रावर केले ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण! जिल्हयात खळबळ, फोटो सोशल मीडीयावर व्हायरल

Todays Headline 5th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

from maharashtra https://ift.tt/hbnxEyj
Murbad News : मुरबाडच्या गावकऱ्यांची व्यथा; चक्क होडीतून करावा लागतोय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना प्रवास
August 04, 2022
0
Tags