<p style="text-align: justify;"><strong>Maharashtra Rains Live Updates :</strong> विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्यानं कही ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे परिसरासह राज्यातील नांदेड, नाशिक, लातूर, अहमदनगर या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विशेषत: मराठवाड्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून काही ठिकाणी शेती पिकांना देखील फटका बसला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता देखील सांगण्यात आली आहे.</p> <p style="text-align: justify;">सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. राज्यातील नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ जावू शकतात. त्यामुळं नद्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी या कालावधीत सतर्क राहावे. कारण पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. <br /> </p>
from maharashtra https://ift.tt/BNpiWfT
Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
August 05, 2022
0
Tags