<p><strong>Maharashtra Rain Live Updates :</strong> राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली आहे. तसेच ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्याठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, मंबई आणि परिसरात काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. आजही मुंबईसह परिसरात आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.</p> <p>दरम्यान, आत्तापर्यंत राज्यात चांगला पाऊस झाला आहे. जूनमध्ये पावसानं दडी मारली होती. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं विदर्भासह मराठवड्यात पूरस्थिती उद्भवली होती. या पुरामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेती पिकांचेही मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान, जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळं विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियात पूरस्थिती निर्माण झाली होती. पण पावसाचा जोर कमी झाल्यानं स्थिती पूर्वपदावर येत आहे. </p> <p> </p>
from maharashtra https://ift.tt/jUgBPaY
Maharashtra Rain Live Updates : मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...
August 19, 2022
0
Tags