Uday Samant : प्रतिशिवसेना भवन उभारण्यात येणार म्हणत सहानुभूती मिळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू असल्याचे नवनिर्वाचित उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटले आहे. तर, येत्या काही दिवसात शिवसेनेची निशाणी आपण घेणार असल्याचा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. राज्यात स्थापन झालेल्या भाजप-सेना सरकारमधील एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटातील शिवसैना समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते

संभाजीराजेची उमेदवारी नाकारणे ही गद्दारी नाही का?
संभाजीराजेची उमेदवारी नाकारणे ही गद्दारी होऊ शकत नाही का? असा सवाल उदय सामंत यांनी केला. तर, प्रतिशिवसेना भवन उभारण्यात येणार असल्याचा दावा करीत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न विरोधक करीत असून असा कोणताही संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला नसून मध्यवर्ती कार्यालय असावे अशी भूमिका असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. विधानभवनाबाहेर झालेल्या बाचाबाची दरम्यान घोषणा न देणाऱ्या विरोधकांमधील काही हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

....तरीही आम्ही शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकारले - उदय सामंत
तर, आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीचे दरवाजे उघडे असल्याचे आवाहन केले असले तरीही आम्ही शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकारले असून त्यांचा निर्णय बंधनकारक असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. तर, घटनापीठाकडे जे प्रकरण सुरू आहे त्यावर जाहीरपणाने बोलणे योग्य नसल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

आमदार आणि खासदार म्हणाले, आम्ही गद्दार नाही
राज्यात स्थापन झालेल्या भाजप-सेना सरकारमधील एकनाथ शिंदे गटातील शिवसैना समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी, त्यांचे ढोलताशाच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. तर, मेळाव्याच्या निमित्त बोलताना आमदार आणि खासदारांनी आपण गद्दार नसल्याचा पुर्नोच्चार करीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील नेत्यांवर जोरदार टीका केली.

भाजप-सेना 200 चा आकडा पार करण्याचा चमत्कार करणार - भरत गोगावले
तर, यावेळेस आम्ही गद्दार होऊ शकत नाही , आम्ही बाळासाहेबांची शिवसेना टिकविण्याचं-वाढविण्याचं आणि हिंदुत्त्व पुढे नेण्याच काम करत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. तर, येत्या काही दिवसात शिवसेनेची निशाणी आम्ही घेणार असून घटनापीठाकडे गेलेला वाद हा आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता नसून आपण पुन्हा निवडून येणार असल्याचा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिशन आपण तोडले असून येत्या निवडणुकीत भाजप - सेना 200 चा आकडा पार करण्याचा चमत्कार करणार असल्याचे भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Lalbaugcha Raja : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाच्या मूर्तीची आज पहिली झलक, लाडक्या बाप्पाचे दर्शन होणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश

from maharashtra https://ift.tt/yE7dYu3
Maharashtra Politics : संभाजीराजेंची उमेदवारी नाकारणे ही गद्दारी नाही का? उदय सामंत यांचा विरोधकांना सवाल
August 28, 2022
0
Tags