Ads Area

Maharashtra Breaking News 01 September 2022 : देशासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...

आज दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन
घरी आलेला, सर्वांचाच लाडका  पाहुणा काहींच्या घरी दीड  दिवसाचा पाहुणचार घेऊन आता आपल्या गावी पुन्हा जाणार आहेत. 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या'च्या गजरात घरगुती गणपतीचं विसर्जन (Ganesh Visarjan 2022) करण्यात येणार आहे

गर्भाशयाच्या कॅन्सरवरील लसीचे आज लॉन्च
भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होतो. मात्र, या घातक आजारावर मात करणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे. गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' ही स्वदेशी लस विकसित केली असून सीरम इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आज 1 सप्टेंबर रोजी ही लस लान्च  होणार आहेत.

आज  शेगावात संत गजानन महाराजांचा 112 वा पुण्यतिथी सोहळा
श्री संत गजानन महाराजांनी आठ सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतली. हा दिवस श्री संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो उद्या हा 112 वा पुण्यतिथी उत्सव असून या उत्सवा प्रसंगी खूप मोठ्या यात्रेचा आयोजन होत असतं. विशेष म्हणजे या उत्सवात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणि विशेषता ग्रामीण भागातून हजारो भजनी दिंड्या सक्रिय सहभागी होतात. श्रींच्या मंदिरावर या परिसरात यानिमित्त विद्युत दिपांची रोषणाई करण्यात आली आहे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबाहेर महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती गणेशोत्सवामध्ये प्रमुख आकर्षण आहे. हजारो महिलांचं सामुहिक अथर्वशिर्ष पठण. ऋषीपंचमीनिमित्त हजारोंच्या संख्येनं महिला अथर्वशिर्षाचं सामूहिक पठण करतात.  ओमकार जप आणि अथर्वशिर्ष पठण करण्यात येतं. महिलांबरोबरच लहान मुलं, ज्येष्ठ असे सगळेच पहाटेपासूनच दगडूशेठ बाहेर पठणासाठी जमतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळ दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 आणि 2 सप्टेंबर रोजी कर्नाटक आणि केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान मोदी कोचीन विमानतळाजवळील कलाडी गावातील आदि शंकराचार्यांचे पवित्र जन्मस्थान श्री आदिशंकर जन्मभूमी क्षेत्रमला भेट देतील. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता, पंतप्रधान कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथेआय एन एस  विक्रांत या पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1:30 वाजता, पंतप्रधान मंगळुरूमध्ये सुमारे 3800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) चा स्थापना दिवस
भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) साठी अतिशय खास आहे.  1 सप्टेंबर 1956 रोजी एलआयसीची स्थापना झाली. तेव्हापासून एलआयसी भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी बनली आहे.

from maharashtra https://ift.tt/wgK5hEV

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area