ShivSena sambhaji brigade : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा काल करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थिती संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असल्याचंही यावेळी घोषणा करण्यात आली. सोबतच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार आहे. यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी संभाजी ब्रिगेडचं कौतुक केलं आहे.

अडचणीच्या काळात यांना संभाजी ब्रिगेड आठवली का?

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, ज्या काळात संभाजी ब्रिगेड सोबत जायला पाहिजे त्या काळात सोबत गेले नाहीत. अडचणीच्या काळात संभाजी ब्रिगेड अत्यंत चांगलं काम करणारी संघटना आहे, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी संभाजी ब्रिगेडचं कौतुक केलं आहे. संभाजी ब्रिगेड बद्दलचे प्रेम सरकारमध्ये असताना व्यक्त केलं असत तर चांगलं झालं असतं, असंही दानवे म्हणाले. ज्या काळात संभाजी ब्रिगेडसोबत जायला पाहिजे त्या काळात सोबत गेले नाहीत, अडचणीच्या काळात यांना संभाजी ब्रिगेड आठवली का? असा सवाल दानवे यांनी केला.

गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांसाठी कोकणात विशेष रेल्वे
गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांसाठी कोकणात विशेष रेल्वे सोडल्या जाणार असून या काळात रेल्वेच्या 218 फेऱ्या करण्यात येणार आहेत, असं दानवे यांनी सांगितलं. सोबतच वेटिंग वाढेल तशा रेल्वेच्या फेऱ्या देखील उपलब्ध करण्यात येतील अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्यावर दानवे यांची टीका

जो माणूस दोन वर्षे मंत्रालयात येत नाही. त्यापेक्षा कंत्राटी चांगले आहेत, असं दानवे यांनी म्हटलं आहे. असं म्हणणाऱ्यांनी आपण दोन वर्षे मंत्रालयात आलो नाही याचा विचार करावा असे म्हणत दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे

राज्याशिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा काल करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असल्याचीही घोषणा करण्यात आली. सोबतच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की, या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असं ठाकरे यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

मोठी बातमी! शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घोषणा, ठाकरे म्हणाले...

<a class="topic_text" title="Shiv Sena Sambhaji Brigade : संघ विचारांचा विरोध केल्यानं आम्ही शिवसेनेसोबत, संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांचं वक्तव्य" href="https://ift.tt/QuWabpd Sena Sambhaji Brigade : संघ विचारांचा विरोध केल्यानं आम्ही शिवसेनेसोबत, संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांचं वक्तव्य

from maharashtra https://ift.tt/oqAP9Hj
संभाजी ब्रिगेड अत्यंत चांगलं काम करणारी संघटना; केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडून कौतुक
August 26, 2022
0
Tags