Sugar Exports : केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी 8 लाख मे टन साखर निर्यातीला मुदतवाढ दिलीय. राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक या संदर्भात मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. साखरेला 8 लाख मे टन निर्यात करण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली होती. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्री पियुष गोयल यांना साखर निर्यातीबाबत कारखानदारांना दिलासा देण्याची विनंती केली होती. महाडिक यांनी मंत्री गोयल यांना याबाबत एक निवेदन दिले, ज्यात म्हटलंय की, Open General Licence (OGL) अंतर्गत अनेक साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी पाठविलेली साखर बंदरांपर्यंत पोहोचली आहे.

...तर साखर कारखान्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल

यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडीक म्हणाले, चांगल्या पावसामुळे साखरेचं बंपर उत्पादन झालं होते. त्यामुळे 90 लाख मे टन साखर निर्यात झाली होती. त्यामुळे साखरेचे भाव वाढत चालले होते. त्यामुळे साखर निर्यातीवर बंदी घातली होती. दरम्यान, कच्ची साखर डोमेस्टीक साठी वापरली जात नाही. ती पडून राहील. या साखरेची विक्री झाली नसती तर उद्योग अडकला असता. जे करार साखर कारखान्यांचे झाले होते ते अडकून पडले होते. या प्रकरणी पियुष गोयल यांना माहिती दिली आहे. साखर कारखानदारांकडे शिल्लक असलेल्या साठ्यामधील कच्च्या साखरेला प्राधान्याने ERO जारी करण्याची गरज आहे. देशात कच्च्या साखरेचा खप मर्यादीत आहे. त्याचे उत्पादन केवळ निर्यातीसाठीच केले जाते. गुणवत्तेच्या कारणामुळे याचा दीर्घकाळ साठा केला जाऊ शकत नाही. जर कच्ची साखर वेळेवर निर्यात केली गेली नाही, तर साखर कारखान्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल.

महाडीक यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटलंय की, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडे (DFPD) कारखानदारांचे अर्ज प्रलंबित आहेत. संबंधितांकडून पडताळणी आणि आवश्यक छाननी करुन 31 मे 2022 रोजी बंदरात प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या साखरेला निर्यात रिलिज ऑर्डर जारी करून निर्यातीस परवानगी दिली जाऊ शकते, असेही त्यांनी सुचवले होते.

from maharashtra https://ift.tt/jTVxZwy
Sugar Exports : साखर निर्यातीबाबत कारखानदारांना दिलासा, 8 लाख मे टन निर्यातीला मुदतवाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
July 07, 2022
0
Tags