Soil testing: शेतकरी मित्रांनो आपण ज्या शेतीमध्ये शेती करतो जमीन पिकवतो त्या जमिनीचा प्रकार कोणता व त्या जमिनीमध्ये कोणती अन्नद्रव्ये पाहिजे आणि किती प्रमाणात आहेत. या सर्व गोष्टींबद्दल आज आपल्याला माहिती करून घ्यायची आहे.
माती परीक्षणाचा नेमका उद्देश काय आहे?
तर किमान वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करणे गरजेचे आहे माती परीक्षण ही जमिनीतील अंगभूत रसायने व जैविक विश्लेषण आहे. यामुळे पिकांना द्यावयाची खताची मात्रा पण निश्चित करता येते यामध्ये नत्र पालाश स्फुरद या पोषक द्रव्यांचा दिलेल्या मातीच्या किती प्रमाण आहे हे बघितले जाते तसेच जमिनीतील विद्राव्य क्षार व जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक यांची तपासणी केली जाते.Soil testing
यामुळे शेतामध्ये नक्की कोणते पीक घ्यायचे आहे हे ठरवता येते तसेच कमी खर्चात जास्त उत्पन्न वाढ होते तसेच पिकांना खतांची मात्रा देखील निश्चित करता येते यामध्ये स्फुरद पालाश व नत्र या पोषक द्रव्यांचा दिलेल्या मातीच्या नमुन्यात किती प्रमाण आहे हे पाहिले जाते.
माती परीक्षण केल्याने होणारे फायदे पाहण्यासाठी
मित्रांनो माती परीक्षण करण्यासाठी आपण दुर्लक्ष करतो पण हे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला आता लक्षात येईल माती परीक्षण केल्याने नेमक्या कोणत्या द्रव्यांची पिके पोषक तत्त्वांची किती मात्रा आहे. हे कळते त्यानुसार खते व इतर पोषक द्रव्यांची उपायोजना करता येते त्याने पिक उत्पादन वाढते.Soil testing
माती परीक्षण करून शेतातील पिकांचे योग्य नियोजन केल्यामुळे दोन पटीने जास्त आर्थिक लाभ प्राप्त करता येतो आणि खतांचा गैरवापर देखील टाळला जाऊ शकतो.
म्हणून मित्रांनो माती परीक्षण करणे शेतीसाठी व आपल्या आर्थिक बाबीसाठी खूप महत्त्वाचे आहे हे माती परीक्षण जिल्ह्याच्या ठिकाणी गटागटाने करता येणे सहज शक्य आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे आपल्या शेतीसाठी व उत्पन्नासाठी महागात पडू शकते त्यामुळे आपले मातीपरीक्षण नक्की करून घ्या.Soil testing
माती परीक्षण केल्याने होणारे फायदे पाहण्यासाठी