Ads Area

Maharashtra Rain Update : आज राज्यात कुठेही रेड अलर्ट नाही, मात्र काही ठिकाणी पूरस्थिती कायम

Maharashtra Rain Update : देशातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस (Hevay rain) कोसळताना दिसत आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मागील काही दिवस राज्यातील अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र आज रायगड (Raigad) , पालघर(Palghar) , पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आजही पाऊस सुरुच राहणार आहे. बुधवारी मुसळधार पावसामुळे नाशिकमधील अनेक भागात पाणी साचले होते. दरम्यान, काल नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विनाकारण घराबाहेर पडू नका,

पुण्यात हवामान विभागाकडून आज आणि उद्या दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुण्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. पुण्याचं खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानं काल विसर्ग वाढवला होता.

कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत

कोकण रेल्वे मार्गावर मातीचा भराव आल्याने दोन तास  वाहतूक ठप्प होती. अंजणी आणि चिपळूण दरम्यान रेल्वेमार्गावर माती आल्यामुळे एक्स्प्रेस खोळंबली होती. कोकण रेल्वेची ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Updates : राज्यात पावसाचा जोर कायम; पुण्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा तर अनेक ठिकाणी सतर्कतेचा आदेश

from maharashtra https://ift.tt/Y4VpqMt

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area