Ads Area

Maharashtra Rain : राज्यात पावसाचं धुमशान सुरुच, हजारो नागरिक बेघर; 104 जण दगावले, गडचिरोलीत थैमान

<a href="https://ift.tt/elpn0RW Rain :  राज्यात सततच्या पावसाचं धुमशान सुरुच आहे. आतापर्यंत पावसामुळं राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर 104 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. गडचिरोलीत परिस्थिती भयंकर असून  गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गडचिरोलीत सिरोंचामध्ये चार दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे. चार दिवस  सिरोंचाला चारही बाजूने पाण्याने वेढलंय.. मेडीगट्टा बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं सिरोंचा जलमय झालंय.. वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या गावाला पुराचा वेढा कायम आहे

नागपूर विभागात-गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 20 मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. या नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत.

कालेश्वरम सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी महत्तम पूर पातळीवरून वाहत आहे. लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे ८५ पैकी ८५ गेट उघडलेले आहेत.  गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

परशुराम घाटात एकेरी वाहतूक

कोंकण विभागात -रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात २०.१ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही, मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा  ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ६ वा. पासून ते सायंकाळी ७. वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून, सायंकाळी ७. वा. ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्य:स्थिती

राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत अति वृष्टीमुळे 104 नगरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर 189 प्राणी दगावले आहेत.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या तैनात

मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर-१, रायगड-महाड-१,  ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१, गडचिरोली -१ अशा  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)  च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी 9 तुकड्या

मुंबई -३, पुणे-२ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२, नागपूर-२ अशा एकूण ४ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या  आहेत.  राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज  सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिध्दीसाठी देण्यात  येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पाऊस थांबला आहे. मात्र विदर्भातील ताज्या पूरपरिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावरील सिरोंचा येथे भयावह स्थिती आहे. गेले चार दिवस हे तालुक्याचे शहर चारही बाजूने पाण्याने वेढले आहे. मेडीगट्टा महाबंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सिरोंचा येथे बॅकवॉटरची स्थिती आहे. तर दुसरीकडे वैनगंगा- प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या गावाला पुराचा वेढा पडला आहे.  1986साली अशाच पद्धतीने विनाशकारी महापूर आला होता. गडचिरोली जिल्ह्यातील 40 गावातील नागरिकांचे ताज्या पुरात स्थलांतर करण्यात आले आहे त्यातील तब्बल 34 गावे सिरोंचा तालुक्यातील आहेत. सिरोंचा येथील स्थानिक प्रशासन पूरग्रस्त नागरिक आणि पडझड झालेल्या घरातील सावरत असलेल्या पूरग्रस्तांना आधार देण्यात गुंतले आहे. गोसेखुर्द धरणातील आवक वैनगंगा नदीत अधिक  प्रवाहित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही मार्ग पुन्हा एकदा बंद झालेत.

from maharashtra https://ift.tt/oiGPX1K

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area