Shivsena : सर्वोच्च न्यायालयात पक्षाशी निगडित महत्त्वाच्या बाबी प्रलंबित असताना त्याआधीच चिन्हाची लढाई सुरू झाल्याने शिवसेनेचे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाणार आहे. आयोगानं दिलेल्या नोटीशीवर कोर्टानं स्थगिती देण्याची विनंती करणार असून अनेक बाबी अद्याप कोर्टात प्रलंबित असल्याची याचिका शिवसेनेने केली आहे. निवडणूक आयोगाच्या नोटिशीविरोधात आज (सोमवारी) शिवसेनेचे वकील ही गोष्ट सुप्रीम कोर्टात मेन्शन करणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेनेने उचलले पाऊल, सर्वोच्च न्यायालयात जाणार

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांना पक्षाच्या निवडणूक चिन्हावरील दाव्याच्या समर्थनार्थ 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. आता निवडणूक आयोगाच्या याच आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची महिती आहे. सर्वोच्च न्यायालयात पक्षाशी निगडित महत्त्वाच्या बाबी प्रलंबित असताना त्याआधीच चिन्हाची लढाई सुरू झाल्याने शिवसेनेचे पाऊल उचलले आहे. आयोगाने दिलेल्या नोटीशीवर कोर्टाने स्थगिती देण्याची शिवसेनेनं विनंती केली आहे. आज सकाळी सुप्रीम कोर्टात शिवसेना ही बाब नमूद करणार आहे. दोन्ही बाजूंना 8 ऑगस्टपर्यंत आपापलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिला आहे

आयोगाच्या नोटिशीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

शिवसेना नेमकी कोणाची? शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे कोणाचं? ही सर्व लढाई निवडणूक आयोगासमोर सुरू झाली होती. शिवसेनेशी संबंधित मातोश्री गटाने सांगितले आहे की, अनेक प्रश्न पक्षाशी निगडित हे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्या सर्व प्रश्नाची उत्तरे अजून मिळालेली नाही. सुप्रीम कोर्टात जो काही निर्णय होईल, त्यामध्ये पक्षावरती कोणाचं प्राबल्य आहे, याशी संबंधित बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. त्यामुळे शिवसेनेने आयोगाच्या या नोटिशीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचं ठरलं आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे यांची की, उद्धव ठाकरे यांची?

शिवसेना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची की, उद्धव ठाकरे यांची? याचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दोन्ही बाजूंचे दावे ऐकल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे. निवडणूक आयोगाच्या नोटिशीविरोधात आज (सोमवारी) शिवसेनेचे वकील ही गोष्ट सुप्रीम कोर्टात मेन्शन करतील. त्यांची पहिली प्रमुख मागणी ही असेल की, आयोगाच्या या नोटिशीला स्थगिती द्यावी. या सर्व प्रलंबित प्रकरणी आधी सुप्रीम कोर्टाने निर्णय घ्यावा, अशी विनंती शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. अशातच आता शिवसेनेला दिलासा देत आयोगाच्या या नोटिशीमध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

from maharashtra https://ift.tt/mTfKMHh
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेनेने उचलले पाऊल, सर्वोच्च न्यायालयात जाणार
July 24, 2022
0
Tags