ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...

निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार

सुप्रीम कोर्टात पक्षाशी निगडित महत्त्वाच्या बाबी प्रलंबित असताना त्याआधीच चिन्हाची लढाई सुरू झाल्याने शिवसेनेचे पाऊल उचलले आहे आयोगाने दिलेल्या नोटीशीवर कोर्टाने स्थगिती देण्याची शिवसेनेनं विनंती केली आहे. आज सकाळी सुप्रीम कोर्टात शिवसेना ही बाब मेंशन करणार आहे. दोन्ही बाजूंना 8 ऑगस्टपर्यंत आपापलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिली आहे

आज द्रौपदी मुर्मूंचा राष्ट्रपपतीपदाचा शपथविधी

द्रौपदी मुर्मू भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एन.वी.रमण्णा त्यांना पदाची शपथ देतील. सकाळी 10.15 वाजता शपथविधी होणार आहे.

खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर आज शिवसैनिकांचा मोर्चा

एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झालेल्या धैर्यशील माने यांना जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांनी मोर्चा काढला आहे. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली धैर्यशील मानेंच्या कोल्हापुरातील घरावर मोर्चा निघणार आहे. धैर्यशील मानेंनी त्यांच्या समर्थकांना शांततेचे केलं आवाहन केलंय. धैर्यशील माने अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत

आजही विदर्भात पावसाचा अंदाज

आज अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात पावसाचा इशारा देण्यात आलाय.

मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्सप्रेसची सेवा आजपासून सुरू

कोरोना काळात बंद केलेल्या मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्सप्रेसची सेवा आजपासून सुरू होणार आहे. प्रगती एक्सप्रेस सकाळी 7.50 वाजता पुण्याहून रवाना होईल तर संध्याकाळी 4.25 मिनिटांनी मुंबईहून पुण्याच्या दिशेने रवाना होईल.

from maharashtra https://ift.tt/HAb1pkB
Maharashtra Breaking News 25 July 2022 : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
July 24, 2022
0
Tags