Ads Area

Maharashtra Breaking News 07 July 2022 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...

परशुराम घाट 9 जुलैपर्यंत घाट वाहतुकीसाठी बंद

परशुराम घाटामध्ये दरड आल्यामुळे घाट रस्ता बंद झालेला होता. रात्री 3.30 वाजता दरड बाजूला करुन वाहतूक सुरु करण्यात आलेली होती. पुन्हा 5 जुलैला मोठ्या प्रमाणात परशुराम घाटामध्ये दरड खाली येवून पूर्णपणे वाहतूक बंद झालेली आहे. अतिवृष्टी सुरू असून घाटामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक दरडी केव्हाही खाली येण्याची शक्यता आहे. 9 जुलै पर्यंत हवामान खात्याकडून जिल्हयासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्यामुळे 6 जुलै ते 9 जुलै दरम्यान घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

पुढील पाच दिवस अलर्ट

मुंबईसह कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तुफान फटकेबाजी सुरु असतानाच पुढील 5 दिवसासाठी अलर्ट देण्यात आलाय.  कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हयांना अतिवृष्टी तर काही जिल्हयांना   मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

आषाढी वारी

ज्ञानोबांची पालखी आज भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे. ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होणार आहे. तर संत सोपानदेव भेट सुद्धा होणार आहे.   तुकोबांची पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी असणार आहे. तोंडले बोंडले येथे धावा होणार आहे.

शिवसेनेला आणखी एका उठावाची भीती?

खासदार भावना गवळींना लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन हटवण्यात आलयं. एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 आमदारांसह बंड पुकारत शिवसेनेतील पक्षश्रेष्ठी अलर्ट मोडवर आलेत धक्का दिला.  शिवसेनेचे 12 खासदार फुटणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.   काही दिवसापुर्वी भावना गवळी आणि राहुल शेवाळेंनी लिहलेलं पत्र या दिशेने असल्याची चर्चा आहे.

उमेश कोल्हे हत्या प्रकरण

उमेश कोल्हे यांच्या घरी कपिल मिश्रा कुटुंबियांना भेट देऊन 30 लाख रुपयाची सहायता निधी येणार आहे. अमरावती येथील बहुचर्चित उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) करणार असल्याने प्रकरणाशी संबंधित संपूर्ण कागदपत्रे तसेच अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींचा ताबा एनआयए घेणार आहे. या आरोपींना आज रिमांडसाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते 1800 करोड रूपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि शिलान्यास करणार आहेत. दुपारी 2 वाजता एलटी कॉलेज येथे अक्षय पात्र मध्याहन भोजन किचनचं उद्घाटन करणार आहेत.

आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक

आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना ज अर अँम्ब्युलन्सने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात हलवलं जाणार आहे.

भारत आणि इंग्लंड संघा दरम्यान आजपासून तीन सामन्यांच्या टी- 20 मालिकेला सुरूवात

भारत आणि इंग्लंड संघादरम्यान आजपासून तीन सामन्यांच्या टी- 20 मालिकेला सुरूवात होणार आहे. पहिला सामना साऊथेंप्म्टन येथे रात्री 10.30 वाजता होणार आहे.

from maharashtra https://ift.tt/AtJ4IBS

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area