Land Record: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत की, वडीलोपर्जित जमिन नावावर करण्यासाठी आपल्याला किती खर्च येतो व त्या साठी कोण कोणती कागदपत्रे लागतात. अशी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. यामुळे तुम्ही हा लेख संपूर्ण नक्की वाचा.
Land Record नवीन शासन निर्णयानुसार आता जमीन नावावर करण्यासाठी फक्त 100 रुपये लागणार आहेत. परंतु मित्रांनो हे लक्षात ठेवा कि आपल्या कुटुंबातील म्हणजेच रक्ताच्या नात्यातील व्यक्तीची जमीन आपल्याच कुटुंबातील म्हणजेच रक्ताच्या नात्यातील व्यक्तीच्या नावावर करण्यासाठी हा शासन निर्णय लागू होत आहे.
त्याचबरोबर कुटुंब सोडून इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरित करण्यासाठी आपल्याला बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क भरावा लागणार आहे. म्हणजेच फक्त आपल्या कुटुंबातील आईच्या किंवा वडिलांच्या नावावरील जमीन आपल्याच मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर करण्यास हा शासन निर्णय लागू होत असल्याचे पहायला मिळत आहे.Land Record