Kusum Solar Pump Scheme 2022: केंद्र व राज्य शासनाच्या निर्णया नुसार आता ‘महा कृषी ऊर्जा अभियान’यानुसार आता नवीन अर्ज करण्यास सुरुवात झाले आहे.
मित्रांनो कुसुंम सोलार पंप योजनेचा केंद्र शासनाचा मुख्य हेतु म्हणजे शेतकरी बांधव हे विजेपासून स्वतंत्र होऊन कृषी सोलार पंपाचा अवलंब करावा. याकरीता शासन 90 ते 95 टक्के अनुदान देखील देत आहे. यामुळे ही बातमी सर्वत्र शेतकऱ्यांसाठी खूपच आनंददायक आहे.परंतु, आपल्याला जर सौर पंप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपणाला देशील ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
प्रधानमंत्री कुसुम ब(B) योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कोणकोणत्या सौर कृषी पंप साठी अर्ज करता येईल ते देखील निश्चित केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 3 HP, 5 HP आणि 7.5 HP अशा क्षमतेच्या सौर कृषी पंप साठी अर्ज करता येईल.
कोणत्या शेतकऱ्याला किती अनुदान मिळणार
आपल्याला Kusum Solar Pump Scheme 2022 या योजनेचा लाभ घेण्यासाठी महा ऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. परंतु,या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्याला किती अनुदान दिले जाणार आहे. याची देखील माहिती देण्यात आलेली आहे त्या माहितीनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदान जाहीर केले आहे.Kusum Solar Pump Scheme 2022