Fertilizer Subsidy 2022: मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवित आहे. त्यामधील सर्वात मोठी योजना म्हणून पी एम किसान योजना होय. त्याचबरोबर मोदी सरकार छोट्या मोठ्या नियोजनातून शेतकऱ्यांना किंवा भारतातील नागरिकांना आर्थिक मदत देत असते. आता सरकारने या वर्षीच्या खतावर अनुदान वाढ निश्चित केली आहे. आणि त्याचबरोबर खतांचे नवीन दर देखील घोषित केले आहेत.
शेतकरी मित्रांनो तुम्हालाही खतांचे नवीन दर जाणून घेण्याची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व खतांची नवीन दरे पाहू शकतात. वाढत्या महागाईमुळे शेतकरी हा खूपच चिंताग्रस्त झालेला पाहता सरकारने खतावर अनुदान देण्याची मोठी घोषणा केली असून यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे.Fertilizer Subsidy 2022
Fertilizer purchase Subsidy या योजनेच्या माध्यमातून सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना खत खरेदी साठी निश्चित अनुदान देत आहे. त्यानुसार यावर्षी देखील खताच्या किमती या मागील वर्षी एवढ्याच राहतील अशी घोषणा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. माहितीनुसार डीएपी खताची पिशवी चे अनुदान हे 512 रुपयांवरून 2501 रुपये एवढे करण्यात आले आहे. या अनुदान नुसार शेतकरी 1350 रुपयांनी एक पिशवी खरेदी करू शकतो.
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पोषण मूल्यावर आधारित खत अनुदानात वाढ केली असून केंद्र सरकारने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत चालणाऱ्या खरीप हंगामासाठी 60 हजार 939 कोटी रुपयांच्या अनुदानास मान्यता दिली असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पोशक आधारित खतावर 3 हजार 789 एवढ्या कोटींची तरतूद करण्यात आली आहे.Fertilizer Subsidy 2022