CM Eknath Shinde : 15 दिवसांनंतर मी ठाण्यातील माझ्या घरी परतलो आहे. मुंबईत दिवसभर मुसळधार पाऊस पडत आहे पण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून मला आनंद झाला. मी राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचे वचन देतो. माझ्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाची नवी उंची गाठेल. आधी विधानसभेत अध्यक्षपद मिळविले आणि आता बहुमत चाचणीतही मोठा विजय मिळवला आहे. लोक आमच्यासोबत आहेत हेच यातून दिसून येते. असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री परतले ठाण्यात, भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत
भाजपाच्या ठाणे शहरातील खोपट येथील कार्यालयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री भेट दिली. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. तसेच उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात ठाणे शहराला प्रथमच एकनाथ शिंदे यांच्या रूपाने पहिला मुख्यमंत्री लाभला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीने आमदार व भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस संदीप लेले, भाजपा गटनेते मनोहर डुंबरे,महिला मोर्चा अध्यक्षा मृणाल पेंडसे,यांच्यासह माजी नगरसेवक सूनेश जोशी,माजी नगरसेविका नंदा कृष्णा पाटील,स्नेहा रमेश आंब्रे यांच्यासह अनेक मान्यवर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्र्याकडून तीन मोठ्या घोषणा
शिंदे-फडणवीस सरकारनं 164 सदस्यांचा पाठिंबा मिळवत विधानसभेतील बहुमत चाचणी आज जिंकली. विधानसभा अध्यक्ष निवडीपाठोपाठ बहुमत चाचणी जिंकून सरकारनं विरोधी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आणि पहिला टप्पा पार केला. काल मुख्यमंत्र्यांनी समारोपाच्या भाषणावेळी तीन मोठ्या घोषणा केल्या. एकनाथ शिंदेच्या भाषणाच्या समारोपावेळी 3 मोठ्या घोषणा केल्या. त्यात हिरकणी गाव वाचवण्याकरता 21 कोटींचा निधी मंजूर केला. पेट्रोल-डिजेलवरील वॅट कमी करण्याचा निर्णय नवं सरकार कॅबिनेटमध्ये लवकरच करणार असल्याचं सांगितलं आणि शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करु, असंही ते म्हणाले

आनंद दिघे यांच्या प्रेरणेनं आजही ठाण्यात शिवसेनेचा दबदबा कायम - शिंदे

आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना संपणार, अशा चर्चा होत्या. मात्र बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रेरणेनं आजही ठाण्यात शिवसेनेचा दबदबा कायम आहे. आजही शिवसेना जीवंत आहे. अनेकदा अन्याया विरोधात बंड केला. रात्रंदिवस काम केलं, मेहनत केली त्यामुळे आज इथे उभा आहो. शिवसेनेनं सगळं दिलं त्यामुळे कायमच शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून राहिल, असंही ते म्हणाले.

from maharashtra https://ift.tt/QJfBz30
Eknath Shinde : आजही ठाण्यात शिवसेनेचा दबदबा कायम, ठाण्यात परतताच मुख्यमंत्री म्हणाले...
July 04, 2022
0
Tags