Ads Area

Crime News : पत्नी आणि सासूवर बंदुकीने गोळ्या झाडत तडीपार जावयाने काढला पळ; पोलिसांनी घेतले ताब्यात.

Crime News : पैशांच्या वादातून तडीपार आरोपीने सासूवर गोळी झाडल्याचा प्रकार धारावीत समोर आला. यामध्ये सासू थोडक्यात बचावली. तसेच, अटकेच्या भीतीने स्वतःवरही गोळी झाडून सायन रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी (Dharavi Police) आरोपी जावई खय्यामुददीन मोईनउद्दीन सय्यद विरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

तडीपार जावयाने सासू- पत्नीवर बंदुकीने फायरिंग
धारावी पोलीस ठाण्यांचे हद्दीत पी. एम. जी. पी. कॉलनी येथे राहणारी नसीम शेख (वय 50) या त्यांच्या 2 मुलीं 2 मुलांसह राहतात. त्यांचे एका मुलीने खय्यामुददीन मोईनुददीन सय्यद (वय 32) वर्षे याच्याबरोबर लग्न केले आहे. सध्या खय्यामुददीन हा धारावी पोलिस ठाण्यांकडून गेल्या वर्षी तडीपार करण्यात आल्याने कर्जत, रायगड येथे राहत होता. त्याची पत्नी नाजमीन ही पी.एम.जी.पी. कॉलनी येथे राहत होती अशी पोलिसांनी ही माहिती दिली.

गुन्हा केल्यानंतर स्वत:वर झाडली गोळी

काल 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास खय्यामु्द्दीन त्याच्या सासुकडे आला व त्याची पत्नी नाजमीन हिला यापूर्वी दिलेले 40,000 रुपये परत मागितले. त्यावरून नाजमीन हिचा नवरा खय्यामुददीन याचा सासू व पत्नीसोबत वाद झाला. त्या भांडणात खय्यामुददीनची सासु नसीम व त्याचा मेहुणा पप्पू उर्फ शोएब याचासुध्दा सहभाग झाला. त्या भांडणात खय्यामुददीन हा बिल्डींगच्या खाली येऊन त्याने सासु-नसीम व पत्नी यांच्यावर त्याचेकडील पिस्तुलने फायरिंग केले व पळून गेला. याबाबत खय्यामुददीन विरूध्द त्याचे सासुने दिलेल्या तक्रारीवरून धारावी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा केल्यानंतर खय्यामुददीने स्वतःला वाचविण्यासाठी त्याचे डाव्या दंडावर फायरिंग करून स्वत:हून जखम केल्यावर सायन हॉस्पीटल येथे उपचारासाठी जात असल्याची माहिती दिली

from maharashtra https://ift.tt/8kKX6CD

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area