Ajit Pawar : शेतकरी संकटात असताना राज्यात मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) आम्ही दोघे करतोय ना? हे म्हणणेही योग्य नाही असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय, अजित पवार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टी बाधित भागाच्या दौऱ्यावर आहेत. काय म्हणाले अजित पवार?

ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आधीच केलीय - अजित पवार

ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आधीच केली आहे. पहिली पेरणी वाया गेली आहे, दुबार पेरणीचे संकट आहे. शेतातील रोपे गळून गेली आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पूल वाहून गेले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले होते. मात्र, गडचिरोलीत आतील भागात जाऊ शकले नाही. एवढ्या दिवसात जशी मदत मिळणे अपेक्षित होते, तशी झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना sdrf चे निकष बाजूला ठेऊन आम्ही मदत करत होतो. गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.. खासकरून मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.

प्रत्येक फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार असेल तर ते शक्य नाही.
मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये. दोघे म्हणतात आम्ही दोघे काम करतो आहे ना. मात्र हे शक्य नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार असेल तर ते शक्य नाही. त्यांना एवढं मोठं बहुमत मिळालं आहे, त्यांनी ते विधानसभेत दाखविलेही आहे. मग मंत्रिमडळ विस्तार का करत नाही? आज ही मी काही मुद्द्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांना विचारले मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही? ते म्हणाले आम्ही करतो. मात्र ते विस्तार करतो असे म्हणत असले तरी ते होत नाही, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. कदाचित त्यांना दिल्लीतून परवानगी मिळत नसावी, की इतर काही समस्या आहे, हे माहीत नाही.

राज्याचे प्रश्न सुटणार नाही ही वस्तुस्थिती
लवकर अधिवेशन बोलवा अशी आमची मागणी होती. मात्र, ते ही बोलावले जात नाही आहे. त्यामुळे जशी मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, तशी मदत मिळताना दिसत नाही. माझी अशी एकीव माहिती होती की मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहे. मात्र ज्यांना त्यांना भेटायचे होते, कदाचित ते उपलब्ध नव्हते, अखेर दिल्लीतील श्रेष्ठींना संपूर्ण देशाचा कारभार पाहायचं असतो. त्यामुळे आम्ही टीका करण्याचे कारण नाही. उद्धव ठाकरे यांनी एकीकडे मुलाखत द्यायची आणि त्याला मग उत्तरे दिली जातात. यातून राज्याचे प्रश्न सुटणार नाही ही वस्तुस्थिती आहे.

म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही?
सत्ता बदल होता ना मोठ्या प्रमाणावर आश्वासन देण्यात आली, त्याची पूर्तता कठीण होत आहे. म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही का? असे ऐकले आहे, भाजपकडे 115 आमदार आहेत भाजप कार्यकारिणीमधील रोख लक्षात घेतला तर आमदारांनी त्यागाची भावना ठेवा असे सांगण्यात आले. तिकडे शिंदे गटातूनही कोण मंत्री होणार? कोण राज्यमंत्री होणार? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे विस्तार होत नसावे.

from maharashtra https://ift.tt/5PQJuam
Ajit Pawar : शेतकरी संकटात असताना राज्यात मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही? अजित पवारांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सवाल
July 27, 2022
0
Tags