Ads Area

Mumbai High Court : गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्ती वापरण्यावर घातलेल्या बंदीचा निर्णय योग्यच, उच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Mumbai High Court : प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) च्या गणेशमूर्तीवर राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) दिलेल्या बंदीच्या निर्णायाला दिलेलं आव्हान सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. हरित लवादाने यासंदर्भात दिलेले आदेश योग्यच असल्याचं निरीक्षण नोंदवत हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडू मातीच्या मूर्ती पर्यावरणासाठी पूरक - हायकोर्ट

शाडूची माती ही पीओपीपेक्षा पर्यावरणासाठी घातक असून कोणताही शास्त्रोक्त अभ्यास न करता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं पीओपीच्या वापरावर बंदी घातली आहे. याशिवाय बंदीत मार्गदर्शक तत्त्वाद्वारे कशी काय घातली जाऊ शकतात? असा प्रश्नही याचिकाकर्त्यांचे वकील संजय गुंजकरांनी उपस्थित केला होता. मात्र हा निर्णय शास्त्रशुद्ध अभ्यासाअंतीच घेण्यात आल्याचं प्रदूषण मंडळाकडून हायकोर्टाला सांगण्यात आलं. हे प्रकरण गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय हरित लवादानंतर सर्वोच्च न्यायालयातही गेलं होतं. सर्वोच्च न्यायालयानंही एनजीटीचा निर्णय योग्य ठरवल्याचं निदर्शनास येताच सर्वोच्च न्यायालयानं यावर निर्णय दिलेला असताना या प्रकरणावर नव्याने सुनावणी घेता येणार नाही, असं स्पष्ट करून हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.

हरित लवादाचा निर्णय पर्यावरणाच्या संवर्धनासाठी योग्यच

पीओपीच्या बंदीविरोधात मागील वर्षी हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. तेव्हा, मुंबई उच्च न्यायालयाने प्रकरण राष्ट्रीय हरित लवादाकडे वर्ग केलं होतं. त्यावर हरित लवादाने मूर्तीकारांची मागणी फेटाळून लावत पीओपीवरील बंदी कायम ठेवली. त्याच निर्णायाला काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेतून आव्हान दिलं होतं. त्यावर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्ती वापरण्यावर घातलेल्या बंदीचा निर्णय योग्यच

पर्यावरणासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तसेच पीओपीच्या मूर्तींमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याचं सांगत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं साल 2010 मध्ये पीओपीचा वापर करू नये, याबाबत नियमावलीही जाहीर केली होती. त्यानंतर साल 2020 मध्ये याबाबत सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली. तसेच गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणं आणि वापरण्यावर बंदी घालण्यात आली. या मूर्तीसाठी शाडूच्या मातीचा वापर करण्याची सूचना जारी करण्यात आली आहे.

from maharashtra https://ift.tt/kwJCDdG

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area