Maharashtra Nashik News : आगामी नाशिक महापालिका निवडणूक (Nashik Municipal Election) मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून आतापर्यंत 28 हरकती दाखल झाल्या असून सर्वाधिक हरकती या नवीन नाशिक या विभागातून करण्यात आल्या आहेत. तर अद्यापही 01 जुलैपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत.

नाशिक महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असून त्या संदर्भातील मतदार याद्या 23 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. सदर मतदार याद्या प्रसिध्द केल्यानंतर नागरिकांनी हरकती आणि सूचना नोंदवण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले होते. त्यानुसार आजपर्यंत एकूण 28 हरकती महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेचे प्रशासन उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली.

दरम्यान, नाशिक मनपा निवडणुकीत सहा विभाग असून यामध्ये सर्वाधिक 24 हरकती या नवीन नाशिक विभागातून दाखल झाल्या आहेत. तर नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, नाशिकरोड विभागातून प्रत्येकी एक एक हरकत दाखल करण्यात आली तर विशेष म्हणजे सातपुर विभागातून अद्याप एकही हरकत दाखल करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, नाशिक महापालिका प्रशासनाने 23 जून सकाळी 11 वाजता मतदार याद्यांची प्रसिद्ध केली. यानंतर ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली. ऑफलाइन याद्या प्रसिद्ध करून शहरातील सर्व सहा विभागांमध्ये त्या ठेवण्यात आल्या आहेत. एक जुलैपर्यंत त्याच्यावर हरकती दाखल होणार असून 9 जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. सुमारे 12 लाख मतदारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. दरम्यान 23 ते 26 जून पर्यंत एकही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती, मात्र आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 28 हरकती दाखल झाले आहे.

74 नागरिकांकडून यादी खरेदी

तसेच नाशिक महापालिकेकडून ज्या नागरिकांना मतदार याद्या विकत घ्यायच्या असतील त्यांनाही आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत सुमारे 74 जणांनी महापालिकेकडून मतदार यादीची खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे.

मतदार याद्या विक्रीला

नाशिक महापालिकेने निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे 23 जून रोजी सकाळी 11 वाजता शहरातील सर्व 133 वॉर्ड अर्थात एकूण 44 प्रभागांची सुमारे 12 लाख मतदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच प्रभाग निहाय यादी प्रसिद्ध करण्यात येऊन ज्या नागरिकांना यादी विकत घ्यावयाची असेल तर त्यांना आवाहन करण्यात आले आहे. आता पर्यंत महापालिकेच्या विविध विभागातून तसेच मुख्यालयातून 74 मतदार याद्या खरेदी केल्या आहेत.

from maharashtra https://ift.tt/vPesWaC
Maharashtra Nashik News : नाशिक मनपा निवडणूक मतदार यादीवर 28 हरकती दाखल, 74 नागरिकांकडून मतदार यादीची खरेदी
June 27, 2022
0
Tags