Ads Area

Maharashtra Breaking News 01 July 2022 : राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, शिदे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री

ठाकरे सरकार पडल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंनी काल शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

उद्धव ठाकरे गटातील आमदारांचं निलंबन होणार?

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांनी दिलेले निलंबनाचे आदेश मागे घेऊ शकतात. तसेच, एकनाथ शिंदे यांना गटप्रमुख करु शकतात. त्यामुळे त्यांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातील आमदारांवर व्हीप लावून त्यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट, कोकणाला ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

संजय राऊतांची आज ईडी चौकशी

दोन दिवसांपूर्वी संजय राऊतांना आलेल्या ईडी समन्सनंतर आता ते उद्या ईडी चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे.  काल महाविकास आघडाीचं सरकार कोसळल्यानंतर आता आम्ही विरोधी पक्षात बसू आणि नवं सरकार पाडण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणार नाही असंही राऊतांनी सांगितलंय. तसंच शरद पवारांनी साथ आजवर दिली त्यामुळे त्यांची साथ सोडणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

आजपासून जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात

आजपासून जगन्नाथ रथयात्रा सुरू होत आहे. यंदा भगवान जगन्नाथ रथयात्रेचे 145 वे वर्ष आहे.  दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन केले जाते. या रथात सहभागी होण्यासाठी परदेशातून लोक येथे पोहोचतात. जगन्नाथ पुरी मंदिर हे भारतातील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.

अमरनाथ यात्रेचा आज दुसरा दिवस

कोरोनामुळे दोन वर्ष रद्द झाल्यानंतर यंदाच्या वर्षी होत असलेल्या बाबा बर्फानी (Baba Barfani) यांच्या यात्रेला सुरूवात झाली आहे. आज यात्रेचा दुसरा दिवस आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड दौऱ्यावर

काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत

मणीपूरमध्ये भूस्खलनात 7 जवान शहीद, 25 जवान बेपत्ता

मणीपूरच्या नोने जिल्ह्यात मोठं भूस्खलन झालं आहे. इंफाळ- जिरिबम रेल्वे लाईनच्या सुरक्षेसाठी तैनात असलेलेल्या टेरेटोरियल आर्मीचे जवान या भूस्खलनात बेपत्ता झाले आहेत. आतापर्यंत 7 जवान शहीद झाल्याची माहिती आहे. 13 सैनिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. तर, अजूनही 25 सैनिक गायब आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

आज 1 जुलैपासून काय बदल होणार

आजपासून देशात सिंगल यूज प्लास्टीकवर बंदी, वित्तीय वर्षात 20 हजारांहून अधिक उत्पन्न असणाऱ्या डॉक्टर आणि मीडिया इन्फ्ल्युएन्सवर 10 टक्के टीडीएस लागणार, आजपासून आधार- पॅन लिंक करणाऱ्यांना 500 रुपये विलंब शुल्क भरावं लागणार, एसी महागणार अशा अनेक गोष्टींमध्ये आजपासून बदल होणार आहेत.

from maharashtra https://ift.tt/LBOIkq3

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area