महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (म.फु.मा.वि.म.) राज्याच्या अनुसूचित जाती व दुर्बल घटकाच्या विकास व कल्याणासाठी काम करत आहे.
महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयाकरीता लघुलेखक (मराठी) / (इंग्रजी), लिपिक टंकलेखक, शिपाई तसेच वाहनचालक या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दि. १२/०४/२०२२ पर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीकरिता कृपया https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.